निधी खर्च न झाल्यास कार्यवाही : राठोड

निधी खर्च न झाल्यास कार्यवाही : राठोड
निधी खर्च न झाल्यास कार्यवाही : राठोड

वाशीम : सन २०१८-१९ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित कालावधीत खर्च होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करून निधी खर्चाची कार्यवाही करावी. निधी अखर्चित ठेवणाऱ्या, समर्पित करणाऱ्या शासकीय यंत्रणांची गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली जाईल, असा इशारा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला. 

नियोजन भवन सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, समितीचे सदस्य, संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

राठोड म्हणाले, ``निती आयोगाने निवडलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशीमचा समावेश आहे. त्यामुळे सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये नियोजन समितीस २५ कोटी ७१ लाख ५० हजार रुपये अतिरिक्त निधी मिळणार आहे. तो निती आयोगाने निश्चित केलेल्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील बाबींवर खर्च करण्यात येईल.``

``जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या रस्त्यांची कामे नित्कृष्ट असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या कामांची चौकशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंता स्तरावरून करण्यात येईल, अशा सूचना राठोड यांनी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० साठी मंजूर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १०२ कोटी ८६ लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत ६२ कोटी ९४ लाख व आदिवासी उपयोजनाअंतर्गत १२ कोटी ६२ लाख ३५ हजार रुपयांच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शेतीला सामूहिक कुंपणाचा प्रस्ताव

कारंजा तालुक्यातील काही गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतीतील पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे या परिसरातील नऊ गावांतील शेतीला सामूहिक कुंपण करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना राठोड यांनी वन विभागाला केली. या कामाला जिल्हा वार्षिक योजनेतून विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे या वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करण्याबाबतचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com