agriculture news in marathi, Action now on wrong transaction of trade | Agrowon

चुकीच्या व्यवहारावर आता कारवाई
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

औरंगाबाद : यापुढे वस्तू व सेवाकरसंदर्भात चुकीच्या व्यवहारावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वस्तू व सेवाकर आयुक्‍त कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (ता. २१) या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला वस्तू व सेवाकर आयुक्‍त कार्यालयाचे अधीक्षक डी. आर. गुप्ता, जॉइंट कमिश्‍नर एस. बी. देशमुख व अशोक कुमार यांची उपस्थिती होती. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १७८ चॅप्टर हेडिंगखाली येत असलेल्या वस्तूवर जीएसटी दर २८ टक्‍क्‍यांवरून १८ टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

औरंगाबाद : यापुढे वस्तू व सेवाकरसंदर्भात चुकीच्या व्यवहारावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वस्तू व सेवाकर आयुक्‍त कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (ता. २१) या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला वस्तू व सेवाकर आयुक्‍त कार्यालयाचे अधीक्षक डी. आर. गुप्ता, जॉइंट कमिश्‍नर एस. बी. देशमुख व अशोक कुमार यांची उपस्थिती होती. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १७८ चॅप्टर हेडिंगखाली येत असलेल्या वस्तूवर जीएसटी दर २८ टक्‍क्‍यांवरून १८ टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

आता केवळ ५० वस्तू आहेत ज्यांच्यावर २८ टक्‍के जीएसटी दर लावण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात वस्तूंचे जीएसटी दर १८ टक्‍क्‍यांवरून १२ टक्‍क्‍यांवर आणण्यात आले असून, काही वस्तूंना पूर्णपणे जीएसटीमुक्‍त करण्यात आले आहे. १० नोव्हेंबरला गुवाहाटीत झालेल्या जीएसटी परिषदेच्या २३ व्या सत्राच्या परिणामस्वरूप जीएसटीच्या प्रभावी दरामध्ये झालेल्या बदलाचे विवरण देण्यात आले आहे.

जीएसटीच्या नावावर अनियंत्रित किमती वाढू न देता ग्राहकांना फायदा पोचविणे यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ऍँटी प्रॉिफटरिंग अथॉरिटीची स्थापना केली आहे. ही यंत्रणा किंमतीची तपासणी करून जीएसटीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचतात की नाही याची सुनिश्चीती करते.

प्रत्येक राज्यामध्ये राज्यस्तरीय पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रभावित ग्राहक एका विशिष्ट नमुन्यात न्यायासाठी अर्ज दाखल करू शकतो. जीएसटीसंदर्भात सिनेमागृहातील अवकाशाच्या वेळात माहिती देत जागृती निर्माण केली जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

नोंदणीकृत व्यक्‍ती वस्तू किंवा सेवाच्या पुरवठ्यावरील कमी केलेल्या दराने किंवा इनपुट टॅक्‍स क्रेडिटचा लाभ ग्राहकास देत नसेल तर प्राधिकरणाला किमतीमध्ये कपात करणे, ग्राहकास व्याजासह किंमतीमध्ये कमी केल्याने मिळालेल्या रकमेएवढी रक्‍कम, अधिनियमानुसार नमूद केल्याप्रमाणे दंड लागू करणे आणि कायद्याच्या अंतर्गत नोंदणी रद्द करण्याचे आदेश देता येत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

इतर बातम्या
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर...नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढलासांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळालातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर...
कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी...नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
पुणे विभागात राष्ट्रीय फलोत्पादन...पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल...परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...