agriculture news in Marathi, action should be taken against who are responsible for delay in promotion, Maharashtra | Agrowon

‘बिंदू नामावली विलंबास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करा’
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

अकोला  ः कृषी सहायक संवर्गातील कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याबाबत गुरुवारी (ता. २१) ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी अायुक्तालयाने तातडीने दखल घेत विभागीय सहसंचालकांना पत्र पाठवित अहवाल सादर करण्याबाबत कळविले अाहे. सन २०११ पासून कृषी सहायक व पर्यवेक्षक संवर्गाची जेष्ठता सूची/बिंदू नामावली प्रसिद्ध न करण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करून तसा अहवालही मागविण्यात अाला अाहे.

अकोला  ः कृषी सहायक संवर्गातील कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित असल्याबाबत गुरुवारी (ता. २१) ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी अायुक्तालयाने तातडीने दखल घेत विभागीय सहसंचालकांना पत्र पाठवित अहवाल सादर करण्याबाबत कळविले अाहे. सन २०११ पासून कृषी सहायक व पर्यवेक्षक संवर्गाची जेष्ठता सूची/बिंदू नामावली प्रसिद्ध न करण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करून तसा अहवालही मागविण्यात अाला अाहे.

कृषी सहायक संवर्गातील कर्मचारी अमरावती विभागात पदोन्नतीपासून वंचित असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. पदोन्नती मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये निराशा तयार झाली अाहे. पदोन्नतीची प्रक्रीया राबवण्यास दुर्लक्ष होत असल्याचा अारोप कनिष्ठ कर्मचारी सध्या करीत अाहेत.

वृत्ताची दखल घेत कृषी अायुक्तालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले की, गट ‘क’ मधील कृषी पर्यवेक्षक संवर्गाची सेवा ज्येष्ठता सूची तत्काळ प्रसिद्ध करण्याबाबत २८ नोव्हेंबरच्या पत्रानुसार सूचित केले होते. तसेच अायुक्तालयात वेळोवेळी अायोजित बैठकीदरम्यान सूचना देऊनही या प्रकरणी कार्यवाही करण्यात अालेली नाही. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या अतिशय गंभीर स्वरूपाची अाहे.

अमरावती विभागात कृषी सहायक व पर्यवेक्षक संवर्गाची १ जानेवारी २०१७ ची अंतिम ज्येष्ठता सूची तत्काळ प्रसिद्ध करावी. पदोन्नतीस पात्र कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत नियमातील तरतुदी तपासून तत्काळ कार्यवाही करण्याचीही सूचना करण्यात अाली अाहे. 

या संवर्गाच्या अद्ययावत बिंदू नामावलीवरून रिक्त पदाची स्थिती निर्धारीत करून तसेच सध्या कृषी पर्यवेक्षक पदावर तदर्थ स्वरूपात कार्यरत कर्मचाऱ्याचे नियमित पदावर समायोजन करून उर्वरित रिक्त पदावर पदोन्नतीस पात्र असलेल्यांना पदोन्नती द्यावी. ३० जून २०११ च्या पदोन्नती समितीचे इतिवृत्त उपलब्ध नसल्याची बाब समोर अाली असून दप्तरी अाहे किंवा नाही याची खातरजमा करण्याचेही कळविण्यात अाले.

इतिवृत्त उपलब्ध नसल्यास समिती  गठीत करून अभिलेखाची पडताळणी करावी व समितीच्या अहवालानुसार अभिप्रायासह प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबतही निर्देश देण्यात अाले अाहेत.

इतर अॅग्रो विशेष
‘कर्जनिधी’चा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार...केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज म्हणून ११ लाख...
अधिक नुकसान, कमी भरपाईराज्यभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही...
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
तेहेतीस वर्षांपासून ‘बोन्साय’ कलेचा...पुणे येथील प्राजक्ता काळे यांनी ३३ वर्षांपासून...
उसापेक्षा किफातशीर ठरले रताळेसोलापूर जिल्ह्यातील बाभूळगावाने रताळे पिकात आपली...
हमी नको, हवा रास्त भाव केंद्र सरकारने २०१८ चा अर्थसंकल्प सादर करताना...
राज्यात अधिकाधिक ‘सीड पार्क’...दर्जेदार बियाण्यांच्या संशोधनासाठी खासगी...
दीडपट हमीभाव : केंद्र सरकारचं लबाडाघरचं...केंद्र सरकार आकड्यांचा खेळ करून स्वतःच्या सोयीचा...
उत्पादन खर्च काढण्यात सरकारची चलाखीपुणे : केंद्र सरकार आपल्या सोयीचा उत्पादन...