agriculture news in marathi, Action taken after crop loan failure - District Collectorate | Agrowon

पीककर्जासाठी टाळाटाळ केल्यास कारवाई : जिल्हाधिकारी सुभेदार
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच बॅंकांमधील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी (ता. २२) दिला.

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच बॅंकांमधील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी (ता. २२) दिला.

जिल्हा अग्रणी बॅंकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक श्री. सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्यासाठी १३८९ कोटीचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत ६३९ कोटी ७१ लाख पीककर्ज वाटप केले आहे. उर्वरित पीक कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत तसेच सर्वच बॅंकांनी युद्धपातळीवर हाती घ्यावे, कोणत्याही पात्र शेतकऱ्याला पीककर्ज नाकारणे गैर असून या कामी बॅंकांनी सदैव सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे हित जोपासावे. १५ जूनअखेर जिल्ह्यातील ६० हजार ५७३ शेतकऱ्यांना ६३९ कोटी ७१ लाखाचे पीककर्ज वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ८० टक्के काम केले असून राष्ट्रीयीकृत बॅंकांचे काम केवळ ८ टक्के ही बाब अतिशय गंभीर आहे.

पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांसाठी ४४९ कोटीचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३८ कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे, ही बाब चिंताजनक आणि गंभीर आहे. पीककर्ज वितरणात खासगी बॅंकांचे काम १२ टक्के आणि ग्रामीण बॅंकांचे काम ५ टक्के झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. `छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७` अंतर्गत लाभ मिळालेल्या २७ हजार ९७२ थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे गरजेचे आहे. या कामी बॅंकांनी सकारात्मक दृष्टिकोन जोपासून सर्वच शेतकऱ्यांना कर्ज देण्याची भूमिका घ्यावी. तसेच कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बॅंकांमध्ये तसेच गावात चावडीवर लावावी, जेणेकरून पात्र शेतकरी पीक कर्जासाठी बॅंकेकडे अर्ज करतील, असे श्री. सुभेदार यांनी सांगितले.

आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश अबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सहायक महाप्रबंधक मोहन सागवेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...