agriculture news in marathi, Action taken on the misuse of funds: Dada Bhuse | Agrowon

निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा भुसे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला.

नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात रूरबन मिशनअंतर्गत दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांची आढावा बैठक झाली. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला.

नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात रूरबन मिशनअंतर्गत दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांची आढावा बैठक झाली. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामसेवकांनी या कामांचा प्राधान्याने पाठपुरावा करून वेळेत काम करण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन भुसे यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने कामांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. आयआयटी सल्लागार नेमून चांगल्या दर्जाची कामे कशी होतील, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताव सादरीकरणाचे आदेश
दाभाडी क्लस्टरअंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचा आराखडा येत्या आठ दिवसांत सादर करण्यात यावा, पर्यावरणपूरक शौचायलयांचे मॉडेल अभ्यासून त्यानुसार शौचालयांचे युनिट उभारण्यात यावे, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व कामे वेळेत होतील रस्त्यांची सर्व कामे नियोजित वेळेत होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना भुसे यांनी केली. क्लस्टरमधील पथदिवे नसलेल्या गावांचा समावेश रूरबन योजनेंतर्गत करण्यात यावा, कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन ग्रामपंचायतीचे नवे कार्यालय उभारण्याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

इतर बातम्या
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
दिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...
खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...
केन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
नाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...
दसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...