agriculture news in Marathi, action will be taken if officers leave office without permission, Maharashtra | Agrowon

कर्मचाऱ्यांनी विनापरनवागी मुख्यालय सोडल्यास कारवाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई : लोकप्रतिनिधींनीच्या गावपातळीवर भेटी होत असताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत, या तक्रारीची दखल घेऊन कृषी आयुक्तांनी आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढले आहे.

मुंबई : लोकप्रतिनिधींनीच्या गावपातळीवर भेटी होत असताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत, या तक्रारीची दखल घेऊन कृषी आयुक्तांनी आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढले आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासकीय आणि शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. 
नुकत्याच झालेल्या यवतमाळ फवारणीच्या दुर्घटनेची गंभीर दखल शासन पातळीवर घेण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी दौऱ्यावर असताना कृषीचे अधिकारी आणि कर्मचारी भेटत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवून उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे.

परंतु क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आणि अडचणी शासनापर्यंत पोचवणेही कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते आणि शेतमालचे उत्पादन आणि विक्रीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

विभाग, जिल्हा, तालुका, मंडळ आणि गावपातळीवर कृषीचे अधिकारी कर्मचारी मुख्यालय सोडून वैयक्तिक कामासाठी जातात किंवा मुख्यालयी राहत नाहीत, अशांवर कारवाईचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. सर्व कृषी संचालक, सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांना सार्वजनिक सुटीच्या दिवशी मुख्यालय सोडण्यासाठी कृषी आयुक्तांची परवानगी लागणार आहे.
कृषी आयुक्तालयातील कृषी अधिकारी, उपसंचालक यांना कृषी उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी उपसंचालकांनी संबंधित जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांची, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांना उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची परवागी घेऊनच मुख्यालय सोडता येणार आहे. यापुढे विनापरवागी मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहे.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...