agriculture news in Marathi, action will be taken if report of soil conservation not sent, Maharashtra | Agrowon

मृदसंधारणाचे तपासणी अहवाल न पाठविल्यास कारवाई
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे : राज्यातील मृदसंधारणच्या कामात गावपातळीवर सुरू असलेल्या गोंधळाकडे अधिकाऱ्यांचे हेतुतः दुर्लक्ष होत असल्याचे कृषी आयुक्तांच्या लक्षात आले आहे. मृदसंधारण कामांचे तपासणी अहवाल पाठवीत नसल्यामुळे आयुक्तांनी एका कृषी सहसंचालकांच्या कामावर नाराजी व्यक्त केली असून, बेशिस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. 

पुणे : राज्यातील मृदसंधारणच्या कामात गावपातळीवर सुरू असलेल्या गोंधळाकडे अधिकाऱ्यांचे हेतुतः दुर्लक्ष होत असल्याचे कृषी आयुक्तांच्या लक्षात आले आहे. मृदसंधारण कामांचे तपासणी अहवाल पाठवीत नसल्यामुळे आयुक्तांनी एका कृषी सहसंचालकांच्या कामावर नाराजी व्यक्त केली असून, बेशिस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. 

शेतकऱ्यांच्या विस्तार कामांसाठी तयार झालेल्या कृषी विभागातील बहुतेक अधिकाऱ्यांना मृदसंधारणाच्या कामात का रस आहे, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र, विस्ताराची कामे सोडून सतत मृदसंधारणात मश्गुल झालेले अधिकारी आपले कर्तव्य व जबाबदाऱ्यादेखील विसरत चालले आहेत. आयुक्तांनी एका सहसंचालकाला पाठविलेल्या पत्रातून अधिकाऱ्यांची अनागोंदी स्पष्ट होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

२०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षात मृदसंधारणाच्या कामांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या आहेत. ‘‘मृदसंधारणाच्या कामांची तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची असते. आयुक्तांकडून या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासणी उद्दिष्ट ठरवून दिलेले असते. मात्र, सदर वरिष्ठ अधिकारी तपासणीही करीत नाहीत व आयुक्तांना अहवालदेखील पाठवीत नसल्याचे उघड झाले आहे,’’ अशी माहिती सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली. 

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एका सहसंचालकाला थेट पत्र पाठवून मृदसंधारणाच्या कामाची तपासणी होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ‘‘अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या टक्केवारीच्या तुलनेत मृदसंधारण कामांची तपासणी करण्यात आलेली नाही. मापे तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतरदेखील अहवाल पाठविण्यात आलेले नाहीत. यावरून संबंधित अधिकारी त्यांचे कर्तव्य व जबाबदारीमध्ये कसूर करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. तपासणी अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या (सहसंचालकांच्या)स्तरावरदेखील उदासीनता दिसते, हे मी खेदाने नमूद करीत आहे,’’ अशा शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट सुटलेल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कृषी विभाग खिळखिळा केला आहे. या अधिकाऱ्यांना वेसण घालण्याचे काम सुनील केंद्रेकर यांच्याकडून चालू असतानाच सोनेरी टोळीने त्यांची बदली करण्यास भाग पाडले. त्यामुळे सध्याचे कृषी आयुक्त श्री. सिंग यांनादेखील कारभार करताना अडचणी येत आहेत. ‘‘विद्यमान आयुक्तांनीदेखील हळूहळू काही विषयांमध्ये लक्ष घातले आहे. अनागोंदी कारभार आपण खपवून घेणार नसल्याचे संकेत आयुक्तांच्या कामकाजातून मिळत आहेत. त्यामुळेच मृदसंधारण कामाच्या तपासण्या वेळेत करून अहवालदेखील सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
मृदसंधारण कामाच्या तपासण्या प्रत्यक्ष दौरा करून केल्या जाव्यात. खर्चात दाखविलेली मापे आणि प्रत्यक्ष स्थिती याची माहिती घेण्यासाठी मापे घेण्यात यावीत. घेतलेल्या मापांनुसार तपासणी अहवाल सादर केले असले, तरच दौरा दैनंदिनी मंजूर करावी, असे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. कृषी सहसंचालकांनी स्वतःचादेखील तपासणी अहवाल न चुकता सादर करावा. सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे प्रस्ताव थेट आयुक्तालयाकडे विनाविलंब सादर करा, असेही आयुक्तांनी नमूद केल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...