agriculture news in Marathi, action will be taken on sugar factories if jute bags not used, Maharashtra | Agrowon

ताग पिशव्या न वापरल्यास साखर कारखान्यांवर कारवाई
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे : देशातील साखर कारखान्यांनी साखर वाहतुकीसाठी २० टक्के तागाच्या पिशव्या (ज्यूट बॅग) खरेदी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या हालचाली कोलकता येथील ताग आयुक्तालयाने सुरू केल्या आहेत.

पुणे : देशातील साखर कारखान्यांनी साखर वाहतुकीसाठी २० टक्के तागाच्या पिशव्या (ज्यूट बॅग) खरेदी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या हालचाली कोलकता येथील ताग आयुक्तालयाने सुरू केल्या आहेत.

ताग आयुक्तालयाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्यातील साखर कारखान्यांची डोकेदुखी वाढली आहे. बाजारात ५० किलोची तागाची पिशवी ३५ रुपयांना मिळते. याउलट प्लॅस्टिकची पिशवी अवघी १६ रुपयांत उपलब्ध आहेत. त्यामुळे साखरेच्या प्रत्येक गोणीमागे १६ ते १९ रुपयांचा आर्थिक फटका साखर कारखान्यांना बसणार आहे.
 
केंद्र सरकारने १९८७ मध्ये देशातील ताग उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पिशवीबंद सामग्रीच्या वाहतुकीसाठी ताग पिशव्या वापरण्याची सक्ती केली. त्यासाठी ताग वेष्टन सामग्रीचा कायदादेखील केला. या कायद्यान्वये साखर कारखान्यांना एकूण वापराच्या २० टक्के पिशव्या तागाच्या वापरणे बंधनकारक आहे. कारखान्यांकडून या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे देशाच्या ताग आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

‘‘कायद्यानुसार तागाच्या किती पिशव्यांचा खरोखर वापर केला, यासाठी साखर कारखान्यांना नमुना क्रमांक दोनमध्ये एक अहवाल द्यावा लागतो. अनेक साखर कारखाने ताग वापराचा अहवाल पाठवतच नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात साखर कारखान्यांनी ताग पिशव्या खरेदीचे नियोजन करून पिशव्या आरक्षित कराव्यात. पिशव्यांचा पुरवठा वेळेत करण्याबाबत ताग आयुक्तालय समन्वय साधेल,’’ असे आयुक्तालयाने म्हटले आहे. 

कायद्यातील तरतुदीनुसार साखर कारखान्यांना ताग पिशव्यांच्या २० टक्के वापराच्या सक्तीचा कालावधी जाहीर केला जातो. त्यानुसार आता १७ डिसेंबर २०१७ पर्यंत ही मुदत अस्तित्वात राहणार आहे. त्यामुळे ताग पिशव्यांचा वापर न करणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात कारवाईचे अधिकार डिसेंबरपर्यंत ताग आयुक्तांना असल्याचे स्पष्ट होते.  

कायदा मोडाल, तर कारवाई करू 
देशाच्या ताग आयुक्तालयातील उपायुक्त दिपनकर माहतो यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. चालू हंगामात ताग वेष्टण सामग्रीचा कायदा मोडला गेला, तर आम्ही पुन्हा मुदत न देता विनाविलंब कारवाई करू, असेही उपायुक्तांनी सूचित केल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक बाजू विचारात न घेता कायद्याचा बडगा उगारणाऱ्या अधिकाऱ्यांना आवर घाला, अशी भावना कारखान्यांमध्ये पसरली आहे.

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...