agriculture news in marathi, The actions of multinational seed companies are socially vulnerable | Agrowon

बहुराष्ट्रीय बियाणे कंपन्यांची कृती समाजविघातक
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

परभणी : बियाण्यांवर एकाधिकार प्रस्थापित करण्याच्या मानसिकतेतून नफेखोर बहुराष्ट्रीय कंपन्या परवानगीशिवाय जनुकीय परावर्तित (जी.एम.) बियाण्याची विक्री करून शेतकरी तसेच समाजविघातक कृती करत आहेत. अशा प्रकारच्या वृत्तीविरोधात शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रिनारायण चौधरी यांनी येथे केली.

परभणी : बियाण्यांवर एकाधिकार प्रस्थापित करण्याच्या मानसिकतेतून नफेखोर बहुराष्ट्रीय कंपन्या परवानगीशिवाय जनुकीय परावर्तित (जी.एम.) बियाण्याची विक्री करून शेतकरी तसेच समाजविघातक कृती करत आहेत. अशा प्रकारच्या वृत्तीविरोधात शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रिनारायण चौधरी यांनी येथे केली.

शुक्रवारी (ता. १) दुपारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शेतकरी भवन परिसरात भारतीय किसान संघाच्या तीनदिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्‌घाटन झाले. या वेळी श्री. चौधरी बोलत होते. भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष ई. बसवेगौडा, उपाध्यक्ष प्रभाकर केळकर, अंबालाल पटेल, विमलाजी तिवारी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक गंगाधरराव पवार, प्रांत उपाध्यक्ष सुभाष देशमुख, जिल्हा मंत्री बळवंतराव कौसडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी श्री. चौधरी पुढे म्हणाले, की ग्रामीण युवकांमधील वाढती बेरोजगारी चिंताजनक आहे. गेल्या वर्षी पीक उत्पादन चांगले आले. परंतु सरकारी घोषणेनंतर देखील शेतीमालाला किमान आधारभूत किंमत एवढे दर न मिळाल्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यात शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले. शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढत असून उत्पादीत मालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे.

कर्जमाफीपेक्षा शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. जनुकीय परावर्तित (जी.एम.) बियाण्यांची विक्री करून समाजविघात कृती करणाऱ्या नफेखोर बहुराष्ट्रीय कंपन्याच्या विरोधात शासनाने कठोर करावाई करावी अशी मागणी चौधरी यांनी केली. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रांताध्यक्ष ज्ञानेश्वर तुपे यांनी केली. या प्रतिनिधी सभेस महाराष्ट्रासह देशभरातील ३४ प्रांतातील ३५० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

दरम्यान, कौन बनाता हिंदुस्तान-भारत का मजदूर, किसान, भारत माती की जय, देश के हम भंडार भरेंगे - लेकिन किमत पुरी लेंगे, अशा घोषणा देत गोपूजन, नांगर पूजन तसेच भारतीय किसान संघाच्या ध्वजारोहण करून प्रतिनिधी सभेचे शुक्रवारी उद्‌घाटन झाले. रविवारी (ता. ३) सभेचा समारोप आहे.

इतर बातम्या
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया...अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...