agriculture news in Marathi, Activate Mhasal and Visapur-Punandi schemes | Agrowon

म्हैसाळ आणि विसापूर-पुणदी योजना कार्यान्वित करा 
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

सांगली ः तासगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील बंद पाणी योजनांमुळे भागात भीषण पाणीटंचाई उभी आहे. भागात पर्जन्य नाही. परिणामी नद्या, तलाव, विहिरी, बोअर, बंधारे कोरडे आहेत. तालुकाच्या पूर्व-पश्‍चिम भागातील बहुतांश गावांना म्हैसाळ व विसापूर-पुणदी योजनेचे पाणी मिळते. मात्र, सध्या या दोन्ही योजना बंद आहेत. त्यामुळे योजनांवरील सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासह, शेतीच्या पाण्याची उणीव भासत आहे. त्यामुळे म्हैसाळ योजना कार्यान्वित करून गव्हाण बंधारा व विसापूर-पुणदीद्वारे सिद्धेवाडी तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

सांगली ः तासगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील बंद पाणी योजनांमुळे भागात भीषण पाणीटंचाई उभी आहे. भागात पर्जन्य नाही. परिणामी नद्या, तलाव, विहिरी, बोअर, बंधारे कोरडे आहेत. तालुकाच्या पूर्व-पश्‍चिम भागातील बहुतांश गावांना म्हैसाळ व विसापूर-पुणदी योजनेचे पाणी मिळते. मात्र, सध्या या दोन्ही योजना बंद आहेत. त्यामुळे योजनांवरील सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासह, शेतीच्या पाण्याची उणीव भासत आहे. त्यामुळे म्हैसाळ योजना कार्यान्वित करून गव्हाण बंधारा व विसापूर-पुणदीद्वारे सिद्धेवाडी तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

म्हैसाळ योजनेचा मणेराजुरी, गव्हाण, अंजनी, सावळज, वज्रचौडे, वडगाव, लोकरेवाडी, नागेवाडी, डोंगरसोनी गावांना फायदा होतो. गव्हाण बंधाऱ्यातून गावांना पाणी योजना केल्या आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून पाइपलाइन टाकून पाणी बागेपर्यंत नेले आहे. परंतु म्हैशाळच्या बंदमुळे गव्हाण बंधारा कोरडा असल्याने म्हैसाळवरील गावे व शेतकऱ्यांपुढे पाणी प्रश्न आहे. हीच स्थिती विसापूर-पुणदी योजनेवरील गावांची आहे.

या योजनेवर हातनूर, हातनोली, मांजर्डे, पेड, आरवडे, पुणदी गौरगाव, पाडळी, धामणी, विसापूर, गोटेवाडी, बलगवडे, चिंचणी, लोढे, सावर्डे, कौलगे, बस्तवडे, खूजगाव, वाघापूर, बिरणवाडी, सावळज ही गावे अवलंबून आहेत. योजनेवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले असून साधारण ७७०० हेक्टर शेती क्षेत्रास लाभदायक असणारी योजना बंद आहे. 

पूर्व भागातील शेतीचा कणा असणाऱ्या म्हैसाळ व विसापूर-पुणदी या प्रमुख पाणी योजना आवर्तन व थकीत बिलापोटी बंद आहेत. दोन्ही योजनेंवरील गावांमध्ये द्राक्षाचे क्षेत्रही मोठे आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून हंगामात व खरड छाटणी नंतर पाण्याची गरज भासते. ऐन उन्हाळ्यात योजना बंद पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह, द्राक्षशेती संकटात आहे.

पूर्व भागातील काही द्राक्षबाग शेतकऱ्यांना म्हैशाळचा व तर काहींना विसापूर-पुणदीचा लाभ होतो. दोन्ही योजना वारंवार बंद राहतात. उन्हाळा चालू आहे. द्राक्षबागांना पाणी कमी पडत आहे. शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत. तेव्हा दोन्ही योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. अन्यथा द्राक्षबागा जगविणे अवघड होऊन बागा काढाव्या लागतील. 
- अमोस सावळजकर, द्राक्षबाग शेतकरी, 
सावळज, ता. तासगाव

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...