agriculture news in marathi, Adivasi Pade to get village standard | Agrowon

आदिवासी पाडे, वाड्यांना महसुली गावांचा दर्जा मिळणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई : राज्यातील ज्या जिल्ह्यात आदिवासी पाडे, वाड्यांनी महसूल गावांचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केलेले असतील, अशा पाडे आणि वाड्यांना तीन महिन्यांत महसुली गावांचा दर्जा देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जाईल, अशी माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी (ता. १४) विधानसभेत दिली.

मुंबई : राज्यातील ज्या जिल्ह्यात आदिवासी पाडे, वाड्यांनी महसूल गावांचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केलेले असतील, अशा पाडे आणि वाड्यांना तीन महिन्यांत महसुली गावांचा दर्जा देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जाईल, अशी माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी (ता. १४) विधानसभेत दिली.

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात २२७ महसुली गावे, तसेच १४४ पाडे, वाड्या असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाग आदिवासी आहे. जी महसुली गावे नाहीत अशा पाडे, वाड्यांना व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ दिला जात नाही. आदिवासी पाडे, वाड्यांना महसुली गावांचा दर्जा मिळावा, अशी लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य डी. एस. अहिरे, कुणाल पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, राज्य सरकारने १ जून १९७६ आणि १८ मे १९८५ ला परिपत्रक काढून आदिवासी पाडे, वाड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामसभेत ठराव घेतल्यानंतर पंचायत समितीमार्फत हा ठराव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या ठरावावर योग्य कार्यवाही केली जाईल. त्यानंतर हा ठराव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी अधिसूचना काढतील. त्यावर आक्षेप घेऊन अंतिम सूचना प्रसिद्ध केली जाईल.

साक्री तालुक्यातील २१ गावातून २५ पाडे, वाड्यांना महसुली गावांचा दर्जा मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ३ पाड्यांना महसुली गावांचा दर्जा दिला आहे. राज्यातील ज्या आदिवासी पाडे, वाड्यांना महसुली गावांचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर तीन महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...