‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ

‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ
‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ

गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला, याची माहिती प्रशासनाकडेच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च महिन्यात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता खात्यात जमा करण्यात येईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते . 

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची स्थिती असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. मोठा गाजावाजा करून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीची मात्र पार लक्‍तरे उडाली आहेत.

योजनेच्या माध्यमातून दोन हेक्‍टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार होते. एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्याने त्यापूर्वी पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची लगीनघाई करण्यात आली.  प्रातिनिधिक स्वरूपात १५ ते २० शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्‍कम जमादेखील झाली. त्यानंतर काही वेळातच ती रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यातून काढूनही घेण्यात आली. या कामासाठी महसूल आणि कृषी विभागाला रात्रंदिवस जुंपण्यात आले. परंतु त्यानंतर आता या योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, याची माहिती मात्र प्रशासनाकडे नाही. परिणामी प्रशासनासोबतच शेतकरीदेखील यामुळे संभ्रमात आहेत.

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाल्याचे संदेशाद्वारे कळविण्याचे प्रस्तावित आहे. तसा संदेशही शेतकऱ्यांना आला नाही. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

लाभार्थी गेले कुठे? जिल्ह्यात २ लाख ८५ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी १ लाख ३५ हजार ७८५ शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टर शेती आहे. त्यामुळे इतके शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले होते. प्रशासनाकडून ही यादी शासनाच्या एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यानंतर ३ हजार ४०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात येईल, असा संदेश प्रशासनाला देण्यात आला. परंतु, लाभार्थ्यांचा अधिकृत आकडा मात्र कोणाकडेच नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com