agriculture news in marathi, administrative board may appoint on market committee, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय मंडळाच्या हालचाली
गणेश कोरे
सोमवार, 20 मे 2019

पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार समितीवरील ‘प्रशासक राजवट’ संपुष्टात आणून पुन्हा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. आपली वर्णी मंडळावर लागण्यासाठी मुळशी हवेली तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर नव्याने स्थापन होणाऱ्या मंडळावर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. 
 

पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार समितीवरील ‘प्रशासक राजवट’ संपुष्टात आणून पुन्हा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. आपली वर्णी मंडळावर लागण्यासाठी मुळशी हवेली तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर नव्याने स्थापन होणाऱ्या मंडळावर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. 
 

ग्रामीण राजकारणातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप सरकारने प्रशासकीय मंडळाची खेळी यापूर्वी केली होती. यासाठी मुळशीचे ज्येष्ठ नेते एकनाथ टिळे यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाची नियुक्ती केली. यानंतर टिळे यांना हे पद न झेपल्याने बारामतीच्या तरुण कार्यकर्ते दिलीप खैरे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रशासकीय मंडळाला कामाचा सूर गवसला नाही. तसेच, मंडळातील अनेक असंतुष्ट सदस्य एकमेकांकडे संशयाने पाहू लागल्याने त्यांच्यामध्ये एकी नव्हती. काही दिवसांनी सरकारमधील मित्रपक्ष असलेले शिवसेनेने पुरंदरचे शिवसेना नेते दादा घाटे आणि बाजार समितीमधील आल्याचे प्रसिद्ध व्यापारी अनिल देवडे यांनी स्वतःचे वजन वापरून मंडळावर आपली वर्णी लावून घेतली, मात्र त्यांनी हे पद केवळ शोभेसाठी वापरले.

या दरम्यान शासनाने प्रशासकीय मंडळाला कामाचा सुर गवसत नसल्याचे पाहून, हिच संधी माजी सचिव, प्रशासक आणि विद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख यांनी हेरली आणि पालकमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे मिळवत सचिवपदी वर्णी लावून घेतली. यासाठी प्रशासकीय मंडळाकडून स्वतःच्या शिफारसीसाठी ठरावदेखील करून घेतला. यानंतर देशमुख यांनी कायद्याच्या ज्ञानाचा खुबीने वापर करत, बाजार समिती विभाजनाची प्रक्रिया राबवित हवेली कृषी बाजार समिती, असे विभाजन करण्यास सरकारला भाग पाडले. यासाठी शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी त्यांना साथ दिली. 

पुणे जिल्हा बाजार समितीचे हवेली बाजार समितीमध्ये विभाजन झाल्यानंतर प्रशासकीय मंडळाची राजवट संपुष्टात आली आणि बी. जे. देशमुख यांनी प्रशासक म्हणून रुजू झाले. प्रशासकांच्या सुमारे दीड वर्षांच्या कालवधीनंतर आता पुन्हा हवेली बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली सरकारकडून सुरू केल्या आहेत. 

बाजार समितीचे विभाजन करताना, हवेली आणि मुळशी तालुक्यांतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीच्या अपेक्षा होत्या, त्या आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना ''बळ'' देण्यासाठी लवकरच प्रशासकीय मंडळ स्थापन होण्याची शक्यता पणन आणि सहकार विभागातन वर्तविण्यात आली आहे.   

ही  नावे चर्चेत 
मागील प्रशासकीय मंडळातील उपाध्यक्ष भषण तुपे, गोरख दगडे, यांच्यासह रोहिदास उंद्रे, राजाभाऊ दाभाडे, सुनील कांचन, चित्तरंजन गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.
 
पायावर कुऱ्हाड मारून घेतली

प्रशासकीय मंडळ असताना पी. ए. खंडागळे सचिव म्हणून कार्यरत होते. यानंतर बी. जे. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांच्या नियुक्तीसाठी प्रशासकीय मंडळाने ठराव करत शासनाला सादर केला. हा ठराव करण्यासाठी पालकमंत्र्यांनी दबाव आणला असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले. मात्र, हा ठराव आपल्या मुळावर येण्याची भीतीदेखील संचालकांना होती. तरी हा ठराव केल्यानंतर आम्ही आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची भावना संचालक व्यक्त करीत आहेत. 

देशमुख यांची आॅगस्टमध्ये सेवानिवृत्ती 
विद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख यांची आॅगस्टमध्ये सेवानिवृत्ती असल्याची चर्चा सध्या बाजार समितीसह सहकार, पणन विभागात आहे. त्यामुळे प्रशासकीय मंडळ स्थापनेच्या हालचाली सुरू केली असल्याचे देखील बोलले जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...