राज्य बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुखदेवे यांचा राजीनामा

राज्य बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुखदेवे यांचा राजीनामा
राज्य बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुखदेवे यांचा राजीनामा

मुंबई : अडचणीतील राज्य सहकारी शिखर बॅंकेचा कारभार रुळावर आल्यानंतर राज्य सरकारने नियुक्‍त केलेल्या अतिरिक्‍त प्रशासकीय संचालक मंडळाची अनागोंदी आणि राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राज्य बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांचा अखेर राजीनामा दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात डबघाईस आलेल्या या बॅंकेला १४ हजार कोटींच्या ठेवी आणि २०० कोटींचा आर्थिक नफा मिळवून देण्यात यशस्वी झालेले अर्थतज्ज्ञ आणि विद्यमान प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी राजीनामा दिला आहे. चार एप्रिल २०१५ पासून डॉ. सुखदेवे हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहकारातील शिखर संस्था असलेल्या या बॅंकेचा कारभार पाहत होते. त्यांच्यासोबत बॅंकिंग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ अशोक मगदूम व के. एल. तांबे यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट २०१७ मध्ये राज्य सरकारने बॅंकेच्या प्रशासक मंडळाच्या सदस्यपदी विद्याधर अनासकर (पुणे) आणि अविनाश महागावकर (सोलापूर) आणि संजय भेंडे (नागपूर) यांची नियुक्ती केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com