agriculture news in marathi, Administrative committee for declare drought | Agrowon

दुष्काळ जाहीर करण्यासाठी जळगावात प्रशासकीय समिती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाचे नेमके अहवाल, माहिती समोर येण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुके दुष्काळी स्थितीत प्रथमदर्शनी दिसत असून, यासंदर्भात अंतिम कार्यवाहीसाठी जिल्ह्यात प्रशासनाने समिती गठीत केली आहे.

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाचे नेमके अहवाल, माहिती समोर येण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुके दुष्काळी स्थितीत प्रथमदर्शनी दिसत असून, यासंदर्भात अंतिम कार्यवाहीसाठी जिल्ह्यात प्रशासनाने समिती गठीत केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी याच महिन्यात अखेरीस कार्यवाही पूर्ण होईल, असे सांगितले. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात धरणगाव, पारोळा व एरंडोल वगळता इतर सर्व तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तीन तालुके वगळता इतर सर्व तालुक्‍यांमध्ये ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १२ तालुक्‍यांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्याची मागणीही यानिमित्ताने झाली आहे. परंतु या महिन्यातील आणेवारी दुष्काळासंबंधी महत्त्वाची असून, पीक कापणी अहवाल, भूगर्भातील पाण्याची स्थिती व इतर बाबी लक्षात घेऊन दुष्काळाची घोषणा होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची समिती कार्यरत झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

ही समिती प्रत्येक तालुक्‍यात किमान पाच ठिकाणी पाहणी करणार आहे. त्यात पीकस्थिती, पाण्याची उपलब्धता, चारा आदींची माहिती घेतली जाईल. महसूल, कृषी विभागातील अधिकारी बांधावर जाऊन पाहणी करेल. ही पाहणीदेखील जिल्हा समितीला मार्गदर्शक ठरणार आहे.

या समितीमध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणा, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसलेल्या तालुक्‍यांमध्ये या महिन्यात काही बदल झालेले दिसले. दुष्काळी स्थितीत संबंधित तालुके आल्याचे स्पष्ट झाले, तर संबंधित तालुकेही दुष्काळाच्या छायेत आणून त्या तालुक्‍यांमध्ये उपाययोजना जाहीर केल्या जातील, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...