agriculture news in marathi, An administrator on the Solapur Market committee | Agrowon

सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी काकडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

सोलापूर : जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाचा पदभार घेतला. समितीचे प्रशासक व शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांनी आपल्याकडील बाजार समितीचा पदभार काढण्याची विनंती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना केली होती. त्या विनंतीनुसार हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. पण अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सोलापूर : जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाचा पदभार घेतला. समितीचे प्रशासक व शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांनी आपल्याकडील बाजार समितीचा पदभार काढण्याची विनंती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना केली होती. त्या विनंतीनुसार हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. पण अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

तत्कालीन सभापती माजी आमदार दिलीप माने यांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर १८ ऑक्‍टोबरपासून या समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर आता या समितीवर प्रशासकाला १६ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भोळे यांच्याकडे सोलापूर नागरी सहकारी बॅंक या विसर्जित बॅंकेचा अतिरिक्त पदभार, अवसायनातील संस्था, सोलापूर शहरातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था, न्यायालयात दाखल झालेले दावे या सर्वांमुळे अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने त्यांनी बाजार समितीचा पदभार काढण्याची विनंती केली होती.

गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती. पण ती मान्य होत नव्हती, अखेरीस ती मान्य झाली. नूतन प्रशासक सुरेश काकडे यांच्याकडे सध्या सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे (केडर) प्रशासक पद आहे. त्यानंतर आता बाजार समितीचे प्रशासकपद आले आहे.  

काकडे यांची प्रशासनावर पकड
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत विशेष लेखापरीक्षक काकडे यांच्या नेतृत्वाखाली लेखापरीक्षकांच्या पथकाने याद्या पडताळणीचे काम कमी कालावधीत पूर्ण केले आहे. प्रशासनावर पकड असलेले अधिकारी म्हणून काकडे यांचा परिचय आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये होत असलेली शेतीमालाची चोरी, व्यापाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन यासह अनेक प्रश्‍नांनी तोंड वर काढले आहे. काकडे या प्रश्‍नांतून कसा मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिस्तप्रिय भोळेंमुळे उलाढाल वाढली
प्रशासकाच्या कालावधीत जबाबदारी असताना कुंदन भोळे यांनी बाजार समितीच्या सेसच्या प्रश्‍नासह समितीतील अनेक प्रश्‍नांत लक्षात घातले होते. बाजार समितीतील व्यवहाराला शिस्त लावण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यांच्याच काळात बाजार समितीची उलाढाल सात कोटींहून अधिक रुपयांपर्यंत झाली. शिस्तप्रिय भोळेंमुळे हे शक्‍य झाले. आता त्यांच्यानंतर याच पद्धतीने कारभार होईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....