agriculture news in Marathi, Administrator's stay in adjournment proceedings | Agrowon

अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच स्थगिती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने जादा लेव्ही व हमाली वसूल करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या अडत्यांवर परवाना निलंबनाची कारवाई करणाऱ्या बाजार समिती प्रशासकांनी स्वत:च्या आदेशाला वीस दिवस होत नाही, तोच स्थगिती दिली. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आग्रहामुळे परवाना निलंबन कारवाईस स्थगिती दिल्याचे कारण बाजार समितीकडून पुढे करण्यात आले. त्यामुळे बाजार समितीच्या कारवाईवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने जादा लेव्ही व हमाली वसूल करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या अडत्यांवर परवाना निलंबनाची कारवाई करणाऱ्या बाजार समिती प्रशासकांनी स्वत:च्या आदेशाला वीस दिवस होत नाही, तोच स्थगिती दिली. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आग्रहामुळे परवाना निलंबन कारवाईस स्थगिती दिल्याचे कारण बाजार समितीकडून पुढे करण्यात आले. त्यामुळे बाजार समितीच्या कारवाईवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे (हवेली) बाजार समितीमधील डाळिंब यार्डातील चार अडत्यांनी खरेदीदार आणि शेतकरी यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीने जादा हमाली व लेव्हीची वसुली केल्याचे समोर आले होते. ही रक्कम कोट्यवधी रुपये असल्याचेदेखील तपासणीमध्ये समोर आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसह बाजार समितीचे सेसद्वारे मिळणारे उत्पन्नदेखील घटल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. हे लक्षात आल्याने बाजार समितीने या प्रकरणाशी संबंधित अडत्यांवर परवाना निलंबनाची कारवाई केली होती. त्यास वीस दिवस झाले नाही तोच डाळिंबाचे अडते के. डी. चौधरी आणि दिलीप बाळकृष्ण डुंबरे या दोघांवर केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आली.

मार्केट यार्डातील डाळिंबाच्या व्यापारावर या कारवाईचा परिणाम झाला होता. पाचशे टनांपर्यंत डाळिंबाची होणारी आवक सुमारे दोनशे ते अडीचशे टनांपर्यंत आली होती. दरम्यान पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी या संदर्भात बाजार समिती प्रशासनाची भेट घेतली. एकीकडे डाळिंब व्यापार पुन्हा सुरू करावा आणि दुसरीकडे दोषी अडत्यांवरील कारवाई प्रशासनाने सुरूच ठेवावी, अशी विनंती त्यांनी केली होती. ते कारण पुढे करीत चारपैकी दोघांचे निलंबन स्थगित करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.

मर्जीतील अडत्यांच्या व्यापार वाढीसाठी खटाटोप प्रशासनाने डाळिंब व्यापार नव्याने सुरू केलेल्या काही मर्जीतील अडत्यांच्या व्यापार वाढीसाठी हा सर्व खटाटोप करीत, डाळिंब व्यापार वेठीस धरल्याचा आरोप काही अडत्यांनी केला आहे. डाळिंब व्यापारासाठी काही अडत्यांनी प्रशासकांच्या आशीर्वादाने गुरांच्या बाजारालगत अनधिकृत शेडबांधणी सुरू केली होती. मात्र, माध्यमांनी हा विषय सातत्याने लावून धरल्याने आणि या प्रकारच्या तक्रारी मंत्र्यांपर्यंत गेल्याने शेड उभारणी थांबविण्यात आली. यामुळे दुखावलेल्या काही अडत्यांनीच डाळिंब यार्डातील आडत्यांवर कारवाईचा आग्रह शेतकरी आणि खरेदीदारांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन केल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

चौधरी आणि डुंबरे यांचे परवाना निलंबन स्थगित करण्यात आले आहे. तपासाच्या कारवाईस अधीन राहून निलंबनास स्थगिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी व्यापार सुरू करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने निलंबन स्थगित केले आहे. उर्वरित दोघा अडत्यांच्या परवाना निलंबनाच्या कारवाईस लवकरच स्थगिती दिली जाईल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...