कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.  सदर परीक्षेसाठी संबंधित विद्या शाखेचे पदवीधर आणि २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम पदवी परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील. विद्यार्थ्यांनी http://www.mcaer.org या संकेस्थवर जाऊन १२ डिसेंबर २०१८ ते १० जानेवारी २०१९ या कालावधीत आॅनलाइन अर्ज भरावे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क आॅनलाइन किंवा चलनाद्वारे स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत १३ डिसेंबर २०१८ ते १४ जानेवरी २०१९ या कालावधीत भरावे. राज्यातील १४ केंद्रांवर १६ मार्च ते १८ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. परीक्षेस पात्र, अपात्रतेची यादी २४ जानेवारी २०१९ रोजी संकेस्थावर प्रसिद्ध होईल.  परीक्षेची नमुना पत्रिका ०३ एप्रिल २०१९ रोजी आणि निकाल ०८ एप्रिल २०१९ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. अधिक माहितीसाठी ०२०-२५५२८११९/२५५२८५१९ या क्रमांकर संपर्क करावा, असे महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. राहणे यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com