agriculture news in marathi, advantage of demonetisation to China | Agrowon

देशातील नोटाबंदीचा फायदा चीनला : भूपेंद्रसिंह हुड्डा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

सांगली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा फायदा चीनला झाला आहे. भारतातील लघु उद्योग मोडून पडले. छोटे व्यापारी, उद्योजक देशोधडीला लागले. त्या तुलनेत चीनहून आयात वाढली. शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक साऱ्यांना एका निर्णयाने उद्‌ध्वस्त करून टाकले, असा आरोप हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी बुधवारी (ता. ८) कॉंग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनात केला.

सांगली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा फायदा चीनला झाला आहे. भारतातील लघु उद्योग मोडून पडले. छोटे व्यापारी, उद्योजक देशोधडीला लागले. त्या तुलनेत चीनहून आयात वाढली. शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक साऱ्यांना एका निर्णयाने उद्‌ध्वस्त करून टाकले, असा आरोप हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी बुधवारी (ता. ८) कॉंग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनात केला.

सांगली येथे आयोजित केलेल्या जनआक्रोश आंदोलनात बोलत होते. केंद्र सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता.८) एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यत अनेक ठिकाणी जनआक्रोश आंदोलन केले.

"भाजपचा परतीचा प्रवास'' सुरू झाल्याचे आणि कॉंग्रेसला पुन्हा ''अच्छे दिन'' येत असल्याचे भव्य चित्र निर्माण केले. व्यासपीठावर हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार पतंगराव कदम, मोहनराव कदम, सतेज पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. हुड्डा म्हणाले, "नोटाबंदीनंतर उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली अन्‌ भाजपला वाटले हा नोटाबंदीवर शिक्कामोर्तब आहे. पण, आज एक वर्षानंतर त्यातील दाहक वास्तव समोर आले आहे. आता दिल्ली सरकार जाणार हे नक्की आहे. कारण, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सामान्य नागरिक साऱ्यांचे वाटोळे झाले आहे. शेतमालाला भाव नाही. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळाची तुलना करा, मग कळेल भाजपने काय वाट लावली आहे. वीज, पेट्रोल दरातील वाढ आणि शेतमालाच्या दरातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला दणका बसतोय.''

मुंडन करून निषेध
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून निषेध करण्यात आला. तसेच सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचा आजपासून प्रत्येक तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून निषेध केला जाईल, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले.

कोल्हापुरात 'स्वाभिमानी'चे
खर्डा-भाकरी आंदोलन

कोल्हापुरात नोटाबंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने बुधवारी (ता. ८) जिल्ह्याधिकारी कार्यालयावर खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याची आता भाजी-भाकरी खाण्याचीसुद्धा ऐपत राहिली नाही. याचा निषेध म्हणून हे आंदोलन केल्याचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांनी सांगितले.

परभणीत पाळला काळा दिवस
परभणीत केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. ८) वर्ष पूर्ण झाले. या निर्णयाच्या निषेधार्थ बुधवारी (ता.८) काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...