agriculture news in marathi, The advantage of the increased rate to a few producers of Mosambi | Agrowon

मोजक्‍याच उत्पादकांना वधारलेल्या दराचा लाभ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसमोर यंदा दरासाेबतच पोषक नसलेल्या स्थितीमुळे संकटांची मालिका कायम आहे. मोसंबीचा आंबे बहार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जवळपास पंधरवड्यापासून वधारलेल्या दराचा लाभ बाग देणे बाकी असलेल्या पाच ते दहा टक्‍केच मोसंबी उत्पादकांना मिळतो आहे.

मराठवाड्यातील मोसंबीला जीआयचे मानांकन मिळाल्याने मोसंबीची गोडी वाढली आहे. जवळपास ४८ हजार हेक्‍टरवर मोसंबीचे क्षेत्र विस्तारले असून, त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र जालना व औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसमोर यंदा दरासाेबतच पोषक नसलेल्या स्थितीमुळे संकटांची मालिका कायम आहे. मोसंबीचा आंबे बहार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जवळपास पंधरवड्यापासून वधारलेल्या दराचा लाभ बाग देणे बाकी असलेल्या पाच ते दहा टक्‍केच मोसंबी उत्पादकांना मिळतो आहे.

मराठवाड्यातील मोसंबीला जीआयचे मानांकन मिळाल्याने मोसंबीची गोडी वाढली आहे. जवळपास ४८ हजार हेक्‍टरवर मोसंबीचे क्षेत्र विस्तारले असून, त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र जालना व औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

यंदा मोसंबी बागायतदारांना नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना टनामागे दहा ते पंधरा हजार रुपये कमी दराने मोसंबीची बाग द्यावी लागली. जवळपास दिवाळीपर्यंत मोसंबीतील दर बारा ते अठरा हजार रुपये प्रतिटनापुढे गेले नसल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

दिवाळीनंतर मात्र जसजशी मालाची कमतरता जाणवू लागली तसतसा मोसंबीचा बाजार वधारत गेला. आजघडीला २५ ते ३० हजार रुपये प्रतिटन, तर काही भागात ३० हजार रुपये प्रतिटनापुढेही मोसंबीला दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अर्थात आंबे बहार अंतिम टप्प्यात असल्याने पाच ते दहा टक्‍क्‍यांपुढे उत्पादक माल विक्रीचे राहिले नाही. केवळ कांड्यावर मोजण्याइतक्‍याच शेतकऱ्यांना वधारलेल्या दराचा फायदा मिळत असल्याचे मोसंबी बाजाराच्या जाणकारांनी सांगितले.

अशा आल्या अडचणी
- बहाराचे व्यवस्थापन करताना पावसाच्या खंडाचा सामना करावा लागला
- बुरशी वाढण्यासोबतच देठकुजमुळे फळगळीचाही फटका बसला
- डासांचा प्रादुर्भाव काही भागात २५ ते ३० टक्‍क्यांहून अधिक
- काही ठिकाणी फळमाशीचाही शिरकाव
- गळीचे प्रमाण २५ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत
 

मोसंबीची पाचशे झाडे आहेत. दरवर्षी ३० ते ३५ टन माल निघतो. यंदा मात्र ३ ते ४ टन माल गळाला. चार दिवसांपूर्वी २९,५०० रुपये प्रतिटनाप्रमाणे बाग दिली. बागेत २० टन माल निघाला.
- सोमनाथ तळतकर, मोसंबी उत्पादक घुंगर्डे, हदगाव जि. जालना.

माझ्याकडे तीन एकर शेतीत मोसंबीची साडेचारशे झाडे आहेत. यंदा फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. अर्धी फळे गळून पडली. त्यामुळे बागेत उत्पादनाचा अंदाज येईना. दोन दिवसांपूर्वी टनाने सौदा झाला. ३५ हजार रुपये प्रतिटनाने मोसंबी दिलीय.
- विष्णू बोडखे, मोसंबी उत्पादक मुधलवाडी, ता. पैठण,

जि. औरंगाबाद.

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...