agriculture news in marathi, Affordably buy tur is totaly False | Agrowon

हमीभावाने तूर खरेदी म्हणजे सरकारची थापेबाजी : कांबळे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

वर्धा : हमीभावाने तूर खरेदी ही सरकारची थापेबाजी असल्याचा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रे उद्‍घाटनानंतरच बंद असून, तीन खरेदी केंद्रांवर अत्यल्प तूर पोचल्याची टीकाही त्यांनी केली.

वर्धा : हमीभावाने तूर खरेदी ही सरकारची थापेबाजी असल्याचा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रे उद्‍घाटनानंतरच बंद असून, तीन खरेदी केंद्रांवर अत्यल्प तूर पोचल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजप सरकार थापेबाजीत आघाडीवर आहे. त्यात दीडपट भाव देण्याच्या नव्या थापेची नुकतीच भर पडल्याचे आमदार कांबळे म्हणाले. तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याचा आव आणला जात आहे. परंतु हमीभावाने तूर खरेदीची घोषणादेखील फसवी असल्याचे ते म्हणाले. सरकारला शेतकऱ्यांविषयी इतकीच आस्था आहे, तर त्यांच्या तुरीची विनाअट खरेदी करावी. जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तूर खरेदीचा बोजवारा उडाल्याने सरकारचा उद्देश याविषयी प्रामाणिक नसल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यात तूर खरेदीची दहा केंद्रे सुरू झाली. यातील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात आलेली सात केंद्रे अद्यापही बंद आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मुहूर्ताला केवळ ५३.८४ क्‍विंटल तूर खरेदी झाली, तर व्हीसीएमएफची तीन खरेदी केंद्रे सोमवारपासून सुरू करण्यात आली.

यात केवळ ३४५.२० क्‍विंटल तुरीची खरेदी झाली. जिल्ह्यात २७०२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्या तुलनेत पहिल्याच आठवड्यात तुरीची अत्यल्प खरेदी झाल्याने सरकारच्या हेतूवरच शंका निर्माण होत असल्याचे आमदार रणजित कांबळे म्हणाले. यापूर्वी बारदान्याअभावी सरकारची खरेदी फसली होती. त्यानंतर कर्जमाफीचादेखील असाच बोजवारा उडाला. त्यात आता तूर खरेदीची भर पडणार असल्याचेही ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...