agriculture news in marathi, After Christmas, the demand of Grape increase | Agrowon

नाताळनंतर द्राक्षांची मागणी वाढली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सांगली : दिवसेंदिवस थंडी वाढू लागली आहे. द्राक्षाची फुगवण कमी होते आहे. याचा परिणाम द्राक्षांवर झाला असल्याने द्राक्षांची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे द्राक्षाला मागणी कमी होती. परिणामी दरही कमी अधिक प्रमाणात होते. मात्र नाताळनंतर द्राक्षाला मागणी वाढली असल्याने प्रतिकिलोस १० ते १२ रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगली : दिवसेंदिवस थंडी वाढू लागली आहे. द्राक्षाची फुगवण कमी होते आहे. याचा परिणाम द्राक्षांवर झाला असल्याने द्राक्षांची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे द्राक्षाला मागणी कमी होती. परिणामी दरही कमी अधिक प्रमाणात होते. मात्र नाताळनंतर द्राक्षाला मागणी वाढली असल्याने प्रतिकिलोस १० ते १२ रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. अर्ली फळ छाटणी घेतलेले द्राक्ष विक्रीस सुरवात झाली आहे. पश्‍चिम बंगाल, कोलकता, बांगलादेश या भागातील व्यापारी सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे. जिल्ह्यात सध्या पाच ते दहा टक्के क्षेत्रातील द्राक्षे बाजारपेठेत येऊ लागली आहेत. द्राक्षाच्या दरात १० ते १२ रुपये प्रति किलोला वाढ मिळत आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे द्राक्षाची गोडी कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नाताळनंतर द्राक्षाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. पुढील आठवड्यापासून निर्यातक्षम द्राक्षे सुरू होतील. त्यामुळे द्राक्षाचे दर अजून पाच ते दहा रुपयांनी वाढतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी यंदाचा हंगाम चांगला आहे. उत्पादनही अपेक्षेप्रमाणे मिळेल अशी आशा आहे. गेल्या वर्षीपेक्षा निर्यातक्षम द्राक्षाला चांगले भाव मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- पांडुरंग जाधव, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर

 

थंडीमुळे द्राक्षाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात द्राक्षाला मागणी आहे. थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. पण पुढील आठवड्यात द्राक्षाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे.
रघुनाथ झांबरे,
 द्राक्ष उत्पादक शेतकरी, डोंगरसोनी, ता. तासगाव.

 

द्राक्षाचे दर (प्रतिचार किलोस)
शरद  :   ३५० रुपये
ज्योती सीडलेस :    ४००
सुपर सोनाक्का  :   २७५ ते ३००
सोनाक्का व माणिक चमन  :  १७५ ते २००

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...