agriculture news in marathi, after heavy criticism the controversial survey stopped by district administration | Agrowon

अॅग्रोवन इफेक्ट : चौफेर टीकेनंतर ‘ती’ पद्धत बंद !
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात एखाद्या गुन्हेगारासारखी पाटी देऊन ओळख पटवली जात होती. पण ॲग्रोवनने पहिल्यांदा हा प्रकार समोर आणला. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती प्रशासनाला सुचलेल्या या दुर्बुद्धीनंतर सगळीकडेच संताप व्यक्त होत होता. सोशल मीडियानेही या प्रकारावर सरकारला चांगलेच झोडले. चौफेर टीकेनंतर अखेरीस प्रशासनाला ही पद्धत बंद करावी लागली. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात एखाद्या गुन्हेगारासारखी पाटी देऊन ओळख पटवली जात होती. पण ॲग्रोवनने पहिल्यांदा हा प्रकार समोर आणला. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती प्रशासनाला सुचलेल्या या दुर्बुद्धीनंतर सगळीकडेच संताप व्यक्त होत होता. सोशल मीडियानेही या प्रकारावर सरकारला चांगलेच झोडले. चौफेर टीकेनंतर अखेरीस प्रशासनाला ही पद्धत बंद करावी लागली. 

काही दिवसांपूर्वी राज्यात विदर्भासह मराठवाड्यात गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाचा घास पळवला. त्यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते आदी मंत्री, काही वरिष्ठ अधिकारी नुकसानीच्या पाहणीसाठी थेट शेतात उतरले. तातडीने पंचनामे करून, नुकसानभरपाईसाठी पुढाकार घेत मदतीची प्रक्रिया सुरू झाली; पण सुलतानी प्रशासनाने यासाठी कहरच केला. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी चक्क शेतकऱ्यांच्या हातात पाटी देऊन नुकसानग्रस्त शेतात उभे राहण्याची ‘शिक्षा’ त्यांना दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यातील चिंचोली भुयार येथील एका महिला शेतकऱ्याचे याच पद्धतीचे छायाचित्र ‘ॲग्रोवन’मध्ये १९ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाले, तेव्हा सगळीकडेच संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे उस्मानाबादसह बीड, लातूर आणि विदर्भाताली काही भागांतही याच पद्धतीने पंचनामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियातही या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटले. स्वतः विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्याबाबत आक्षेप घेत सरकारचा निषेध नोंदवला. वास्तविक, शासनानेच शेतकऱ्यांची ओळख पटवण्यसाठी विशिष्ठ पद्धतीची टॅगिंग पद्धत अमलात आणली आहे. त्यामुळे सहजपणे शेतकऱ्यांची ओळख व अन्य माहिती उपलब्ध होऊ शकते; पण अतिहुशारीच्या नादात नको ती दुर्बुद्धी सुचलेल्या प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली आणि आता ही पद्धत बंद करावी लागली आहे.

शासनाची अशी कोणती सूचना नव्हती, अनावधानाने झालेला हा प्रकार होता. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उभे राहून फोटो घेण्याच्या कल्पनेतून पुढे आलेली ही एक कल्पना होती. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता; पण आता प्रकार बंद केला आहे. जवळपास २१ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी बहुतांश पंचनामे पूर्ण झाले आहेत. 
- अरविंद बोळंगे, तहसीलदार, उमरगा

इतर अॅग्रो विशेष
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक...मुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन...
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेतपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक...औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक...
‘डिमोशन’ रोखण्यासाठी अनेकांची पळापळ;...अकोला ः राज्याच्या कुठल्याही विभागात नसेल असा...
देशात खरीप पेरणीला प्रारंभनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या...
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर,...पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची...
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीजळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या...
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित;...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने...
शेतीतील नव तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा...अकोला :  भारतीय शेतकरी जागतिक बाजारात...
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...