agriculture news in marathi, After Mumbai, farmers protest in Delhi | Agrowon

मुंबईनंतर दिल्लीतही घुमला शेतकरी हुंकार
वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नवी दिल्ली : मुंबईतील आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) दिल्लीत आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी आदी मागण्या आंदोलकर्त्यांनी शेतकऱ्यांनी  केल्या. 

नवी दिल्ली : मुंबईतील आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) दिल्लीत आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी आदी मागण्या आंदोलकर्त्यांनी शेतकऱ्यांनी  केल्या. 

भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली संसद मार्गावर हजारो शेतकरी मंगळवारी दाखल झाले. सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी असा प्रकार स्वीकार्ह नाही असा इशाराही दिला. कृषिपंप वीजबिल माफी, राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना, शेतकऱ्यांना चांगल्या आरोग्य सेवा आदी मागण्याही या वेळी करण्यात अाल्या. किसान संघाचे सदस्य बलराम तिवारी  (बांदा, उत्तर प्रदेश) म्हणाले, की बुंदेलखंड भागात कूपनलिका विहिरींसाठी सर्वसाधारण दरापेक्षा पाच पट अधिक वीज आकारणी शेतकऱ्यांस केली जात आहे. शेतीसाठीच्या विविध शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. यात अन्नपत्रा या योजनेचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये सरकारने दिले, मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभच झाला नाही.  

जमीन सुधारणांवर सरकारने काम करण्याची, तसेच अधिक आणि बेनामी जमिनी भूमिपुत्र शेतकऱ्यांना देण्यात याव्यात अशा मागण्याही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या. शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर विषयाकडेही भारतीय किसान संघाने लक्ष वेधले. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्थेचे निर्माण, शाश्‍वत शेती आणि इतर शेतीविषय मागण्या शेतकऱ्यांनी सरकारकडे केल्या.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...