agriculture news in marathi, After the rest of fortnight, the presence of rain in Solapur | Agrowon

पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर सोलापुरात पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

सोलापूर  : मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर पंधरवड्याच्या दहा दिवस विश्रांती घेऊन सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) पावसाने दमदार पुनरागमन केले. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारावाजेपर्यंत थांबून थांबून बरसत होता. या सहा तासाच्या कालावधीत हवामान विभागाकडे ४९ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळ्यात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला.

सोलापूर  : मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर पंधरवड्याच्या दहा दिवस विश्रांती घेऊन सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) पावसाने दमदार पुनरागमन केले. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारावाजेपर्यंत थांबून थांबून बरसत होता. या सहा तासाच्या कालावधीत हवामान विभागाकडे ४९ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळ्यात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला.

शुक्रवारी दिवसभर कडाक्‍याचे ऊन होते, उकाडाही प्रचंड जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास काहीसे ढगाळ वातावरण झाले. सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मेअखेर व जूनच्या सुरवातीस झालेल्या मुसळधार पावसानंतर वरुणराजाने तब्बल दोन आठवडे विश्रांती घेतली. गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसराच्या वातावरणात बदल झाला होता. मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पावसाची वाट बघत असल्याने खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या या पावसामुळे मार्गी लागतील. अगदी सुरुवातीला सायंकाळी साडेसहा वाजता हलका असणारा पाऊस, हळू-हळू वाढत गेला. रात्री नऊपर्यंत पावसाचा जोर मोठा राहिला. त्यानंतर पुन्हा त्याचा वेग कमी झाला. रात्री बारावाजेपर्यंत पावसाची रिपरिप थांबून-थांबून सुरुच होती.

जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. सायंकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत हवामान विभागाकडे ४९ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. दुसऱ्या दिवशीही शनिवारी (ता.२३) पुन्हा दिवसभर कधी ढगाळ, कधी ऊन असे वातावरण राहिले.

इतर बातम्या
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
दिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...
खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...
केन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
नाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...
दसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...