agriculture news in marathi, After six months water in the river Neera | Agrowon

सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणी
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

वालचंदनगर, जि. पुणे : नीरा नदीवरील भोरकरवाडी (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून नदी पात्रात पाणी सोडले आहे. सुमारे सहा महिन्यांनंतर नदीत पाणी आल्याने निमसाखर, निरवांगी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

वालचंदनगर, जि. पुणे : नीरा नदीवरील भोरकरवाडी (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून नदी पात्रात पाणी सोडले आहे. सुमारे सहा महिन्यांनंतर नदीत पाणी आल्याने निमसाखर, निरवांगी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

निमसाखर, निरवांगी, खोरोची, पिठेवाडी परिसरातील नीरा नदी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरडी पडली होती. नदीत पाणी नसल्यामुळे पिके जळून गेली होती. तसेच शेतीच्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला होता. नदीत पाणी सोडण्यासाठी मार्च महिन्यात परिसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवस उपोषण करून रास्ता रोको आंदोलन, काळ्या गुढ्या उभारणे, मुंडण करणे आदी आंदोलने केली होती. मात्र, प्रशासनाने पाणी सोडण्यास नकार दिला होता. गेल्या आठवड्यात बारामती, फलटण तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्याने इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदीवरील काही बंधाऱ्यांत समाधानकारक साठा झाल्याने बंधाऱ्याची ढापे काढल्यामुळे भोरकरवाडीच्या बंधाऱ्यात पाणीसाठा झाला होता.

निमसाखर, निरवांगी, खोरोची परिसरातील शेतकऱ्यांनी भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर बंधाऱ्याची ढापे काढून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले. सध्या निरवांगी परिसरात बंधाऱ्यातील पाणी पोचले आहे. सुमारे पाच-सहा महिन्यानंतर नीरा नदीत पाणी आल्यामुळे पाण्यासाठी उपोषण करणारे शेतकरी दोन दिवसांमध्ये नदीतील पाण्याचे पूजन करणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...