agriculture news in Marathi, again action on glyphosate, Maharashtra | Agrowon

ग्लायफोसेट बंदीबाबत पुन्हा चाचपणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे: राज्यात ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी न घालण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला असला तरी पंजाबमध्ये बंदी लागू करण्यात आल्यामुळे कृषी विभागाने देखील बंदीबाबत पुन्हा माहिती घेणे सुरू केले आहे. 

‘‘ग्लाययफोसेटवर बंदी घालण्याबाबत कृषी विभागाने यापूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. तथापि, मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा हाती येत नसल्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय रेंगाळला आहे. मात्र, पंजाबच्या कृषी विभागाने बंदीचा निर्णय घेतला असल्यास आम्हालादेखील पुन्हा आढावा घेता येईल,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. 

पुणे: राज्यात ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी न घालण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला असला तरी पंजाबमध्ये बंदी लागू करण्यात आल्यामुळे कृषी विभागाने देखील बंदीबाबत पुन्हा माहिती घेणे सुरू केले आहे. 

‘‘ग्लाययफोसेटवर बंदी घालण्याबाबत कृषी विभागाने यापूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. तथापि, मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा हाती येत नसल्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय रेंगाळला आहे. मात्र, पंजाबच्या कृषी विभागाने बंदीचा निर्णय घेतला असल्यास आम्हालादेखील पुन्हा आढावा घेता येईल,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. 

राज्यात मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांकडून शेतकऱ्याना ग्लायफोसेटचा पुरवठा केला जातो. मात्र, ग्लायफोसेटचे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्या केंद्रीय कीटकनाशके नियम १९७१ मधील १९ व्या नियमाची पायमल्ली करीत असल्याचा ठपका या आधी कृषी खात्याने ठेवला होता. मात्र, ग्लायफोसेटवर बंदी आणण्यासाठी सुरू केलेली कायदेशीर कारवाई कृषी खात्याने अचानक सैल केली. त्यामुळे या कंपन्यांना दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे कृषी विभागाने महाराष्ट्रात ग्लायफोसेट बंदीबाबत कायदेशीर कामकाज सुरू करून पुन्हा स्थगित केले आहे. राज्यात ग्लायफोसेटची विक्री सुरू ठेवण्यास कृषी विभागाने अद्याप परवानगी कायम ठेवली आहे. मात्र, आधी घेतलेल्या सुनावणीचा लेखी निकाल अजूनही कंपन्यांच्या हातात मिळालेला नाही. 

मानवी आरोग्याला घातक ठरणारे विशेषतः कार्सिनोजेनिक म्हणजे कर्करोग होणारे घटक ग्लायफोसेटमध्ये असल्याचा लेखी पावित्रा याआधी कृषी विभागाने घेतला होता. मात्र, बंदी आणल्यास काही कायदेशीर बाबी उद्भवतील अशी धास्ती वाटल्याने कृषी खात्याने या तणनाशकावर महाराष्ट्रात बंदी आणलेली नाही. राज्यात दरवर्षी ३५ लाख लिटर्सच्या आसपास ग्लायफोसेट विकले जात असून शेतकऱ्यांकडून किमान ७०० कोटी रुपये या तणनाशकाच्या खरेदीपोटी शेतकऱ्यांकडून मिळतात. 

आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने कर्करोगास कारणीभूत ठरलेल्या घटकांची यादी तयार केली आहे. ग्रुप २ए या नावाने प्रसिद्ध असलेल्या या यादीनुसार ग्लायफोसेटदेखील त्यात समाविष्ट होऊ शकते. म्हणजेच ग्लायफोसेट कार्सोजेनिक असल्याचा पावित्रा पंजाब शासनाने घेतला आहे. 
‘‘तणनाशक उत्पादक कंपन्यांना ग्लायफोसेटचा उत्पादन व विक्रीचा परवाना केवळ चहा पिकावर तसेच मोकळ्या जागेवर वापरण्यासाठीच दिलेला आहे. केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समितीने (सीआयबी-आरसी) तसे स्पष्ट नमूद केलेले असल्यामुळे आम्ही ग्लायफोसेटवर राज्यभर बंदी आणली आहे,’’ असे पंजाबने दोन दिवसांपूर्वीच घोषित केले आहे.

पंजाबच्या निर्णयाने खळबळ
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, देशात ग्लायफोसेटचा वापर मोठ्याप्रमाणात करणाऱ्या पंजाबमध्ये ग्लायफोसेटवर बंदी आल्यामुळे तणनाशक उद्योगामध्ये खळबळ उडाली आहे. यामुळेच महाराष्ट्रातदेखील पुन्हा आता बंदीची चर्चा सुरू झाली आहे. चंदीगडच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने ग्लायफोसेटमध्ये मानवी डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनएमध्ये आघात करण्याची क्षमता असल्याचा अहवाल दिल्याने पंजाबमध्ये बंदीचा निर्णय घेण्यात आला.

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...