Agriculture News in Marathi, agitation against cow MIlk procurment price reduced by Gokul Sangh, Kolhapur | Agrowon

‘गोकुळ’च्या दूध दरकपातीच्या विरोधात लढा तीव्र करणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी दरात केलेल्या कपातीचा निर्णय हा दुर्देवी असून, शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. संघाने दूध दरात वाढ नाही केली तर यापुढे लढा तीव्र करणार अाहे, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी (ता. २७) येथे दिला.

गोकुळने दर कमी केल्याच्या निषेधार्त श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढला. त्या वेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी दरात केलेल्या कपातीचा निर्णय हा दुर्देवी असून, शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. संघाने दूध दरात वाढ नाही केली तर यापुढे लढा तीव्र करणार अाहे, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी (ता. २७) येथे दिला.

गोकुळने दर कमी केल्याच्या निषेधार्त श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढला. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, की सध्याच्या संचालक मंडळाने सहकाराच्या जोरावर स्वत:चे घर भरून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तो नजीकच्या काळात खपवून घेतला जाणार नाही. आम्ही गोकुळ संपविण्यासाठी नाही; तर गोकुळ दूध संघाच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन करीत आहोत.

सध्या दूध संघात चाललेला गैरप्रकार हा संतापजनक आहे. याच्या विरोधात आम्ही लढा सुरू केला आहे. आमच्या घामाच्या, कष्टाच्या जिवावर हा दूध संघ उभा आहे. भागभांडवल शंभर कोटींच्या वर आहे. यामुळे प्रश्‍न विचारायचा आमचा हक्क आहे.

गोकुळचा कारभार एकमताने चाललेला नाही. उत्पादकांच्या हितासाठी आम्ही विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर तुम्ही द्यावे, अशी आमची मागणी आहे. वार्षिक सभा गुंडाळून संचालकांनी बेजबाबदारपणा दाखविला. याच्या विरोधात आम्ही सहकार न्यायालयातही जाणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादकांना वाचविण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

‘अनावश्‍यक खर्च कमी करा;
उत्पादकांना जादा दर मिळेल’

कमी केलेला २ रुपयांचा दर तुम्ही देऊ शकता हे ऑडिट रिपोर्टवरुू समजू शकते. गाय व म्हशीच्या दुधाची भेसळ करून दूध संघ फायदा मिळवतो. पण तो कागदावर येत नाही. दूध वाहतूक, बल्क कूलर, जाहिराती, संचालकाच्या गाड्या, भाड्याच्या गाड्या यावर बेसुमार खर्च होत आहे. या खर्चाबाबत या रिपार्टमध्ये आक्षेप नोंदविण्यात आलेले आहे. अनावश्‍यक खर्च कमी केल्यास दूध उत्पादकांना नक्कीच जादा दर मिळू शकतो, असे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...