agriculture news in marathi, agitation aginest fuel price hike, parbhani, maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांतील बाजार समित्यांमधील व्यवहार `बंद`मुळे ठप्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

नांदेड   ः इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेससह अन्य पक्ष, संघटनांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘बंद’मुळे बाजार समित्यांमधील शेतीमालाचे व्यवहार ठप्प होते.

नांदेड   ः इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेससह अन्य पक्ष, संघटनांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘बंद’मुळे बाजार समित्यांमधील शेतीमालाचे व्यवहार ठप्प होते.

नांदेड शहरासह जिल्ह्यात काॅंग्रेसतर्फे दुचाकी फेरी काढण्यात आली. काॅंग्रेसचे माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर सायकल रॅली काढली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच संभाजी ब्रिगेड, डॅा. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद आदीं संघटनांनी ‘बंद’ला पाठिंबा दिला होता.

परभणी शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या घोडगाडी रॅलीमध्ये काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी महापौर प्रताप देशमुख, भाकपचे राजन क्षीरसागर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. हिंगोली शहरासह जिल्ह्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आमदार डॅा. संतोष टारफे, उपनगध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

‘बंद’मुळे या तीन जिल्ह्यांतील बाजार समित्यांतील शेतीमालाची खरेदी बंद होती. अनेक सामाजिक संघटना, व्यापारी महासंघ ‘बंद’मध्ये सहभागी झाल्या होत्या. व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले.

इतर बातम्या
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...