agriculture news in marathi, agitation aginest fuel price hike, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

पुणे : इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ काॅंग्रेससह विविध राजकीय पक्षांनी साेमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता राेकाे, निदर्शने करीत माेदी सरकारविराेधात घाेषणाबाजी केली. या वेळी चाेख पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरळीत हाेत्या; तर सुरक्षेच्या कारणास्तव विविध शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली हाेती.

पुणे : इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ काॅंग्रेससह विविध राजकीय पक्षांनी साेमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता राेकाे, निदर्शने करीत माेदी सरकारविराेधात घाेषणाबाजी केली. या वेळी चाेख पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरळीत हाेत्या; तर सुरक्षेच्या कारणास्तव विविध शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली हाेती.

बारामतीत प्रशासनास निवेदन
बारामती ः इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार ‘बंद’ची हाक असूनही सुरू ठेवले होते, व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको यामुळे राजकीय पक्षांनीही कोणावरही ‘बंद’साठी दबाव न आणल्याने शहरात बंद शांततेत पार पडला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्यासह  पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत इंधन दरवाढीचा निषेध केला. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनीही या ‘बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर करत भिगवण चौकात दरवाढीविरोधात निदर्शने केली.

भोर येथे मोर्चा
भोर ः शहरात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात शहरातून मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भोरमध्ये येणार असल्याने काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. दुपारी आमदार संग्राम थोपटे य़ांच्या नेतृत्वाखाली चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरवात झाली. नगरपालिका चौका-मंगळवार पेठमार्गे मोर्चा राजवाडा चौकात आल्यानंतर तेथे भाजप सरकार आणि आमदार राम कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आमदार संग्राम थोपटे य़ांच्या हस्ते तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले.

शिवगंगा खोऱ्यात अल्प प्रतिसाद
खेड-शिवापूर ः इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘बंद’ला सोमवारी शिवगंगा खोऱ्यात अल्प प्रतिसाद मिळाला. पुणे-सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बंद आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा रस्त्यावर सोमवारी सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. तसेच या भागातील व्यवसाय, शाळा आणि महाविद्यालयेही सुरळीत सुरू होती. सकाळी अकराच्या सुमारास शिवगंगा खोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, अभयसिंह कोंडे, अविनाश बांडेहवलदार, जितेंद्र कोंडे, संदीप मुजुमले, राजेंद्र पवार, मधुकर शिरोळे, सोमनाथ वाव्हळ, उमेश घोडके, सचिन धोंडे, नामदेव पवार आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

वाल्हे येथे निषेध सभा
वाल्हे (ता. पुरंदर) ः देशामधील पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर गगनाला भिडलेले असल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले आहे. याचा जाब सरकारला विचारण्यासाठी विरोधी पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी वाल्हे (ता.पुरंदर) येथे महागाई राक्षसाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन व निषेध सभेचे आय़ोजन केले होते.

चाकण परिसरात अत्यल्प प्रतिसाद
चाकण (ता. खेड) ः इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात काॅंग्रेस व इतर पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला चाकण व परिसरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर जनजीवन तसेच दैनंदिन व्यवहार, वाहतूक सुरळीत सुरू हाेती. औद्योगिक वसाहतीतील कंपन्याही नेहमीप्रमाणे सुरू होत्या. याबाबत सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, चाकणला बंदचा परिणाम जाणवला नाही. ‘बंद’दरम्यान काेणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माेठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...