agriculture news in marathi, agitation aginst loan waiver scheme, yavatmal, maharashtra | Agrowon

शासनाच्या धोरणांमुळेच शेतकरी सावकाराच्या दारात : राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

यवतमाळ  : खरिपाची पेरणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना पेरणीसाठी अजूनही पीककर्ज मिळालेले नाही. बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅंका ऐकत नाहीत. शासन पैसे देणार की नाही, याची शाश्‍वती बॅंकांना नाही, त्यामुळे बॅंकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. शासनाच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आल्याचा आरोप  खासदार राजू शेट्टी यांनी केला.

यवतमाळ  : खरिपाची पेरणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना पेरणीसाठी अजूनही पीककर्ज मिळालेले नाही. बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅंका ऐकत नाहीत. शासन पैसे देणार की नाही, याची शाश्‍वती बॅंकांना नाही, त्यामुळे बॅंकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. शासनाच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आल्याचा आरोप  खासदार राजू शेट्टी यांनी केला.

येथील तिंरगा चौकात गुरुवारी (ता. २८) फसव्या कर्जमाफीचा पंचनामा आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी खासदार नाना पटोले, आमदार हरिभाऊ राठोड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर, माजी आमदार वामनराव कासावार, देवानंद पवार, मनीष जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की शासन ऐतिहासिक कर्जमाफीचा कांगावा करीत आहे. कर्जमाफीला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात कर्जमाफीचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. कर्जमाफी शेतकऱ्यांना लाभ देणारी नाही, तर मनस्ताप देणारी ठरली. कर्जमाफीला आज एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस बॅंकर्स समितीच्या बैठका घेत आहेत. कर्जवाटप करावे, असे वारंवार सांगत आहे. मात्र, बॅंका मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

शासनाची यंत्रणा असताना ऑनलाइन प्रक्रियेसाठी ‘युनोवेब’ या खासगी कंपनीला ७५० कोटींचे कंत्राट देण्यात आले. माहिती जमा करण्यात ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे खासदार शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाजपकडे पाहिले. शासनाने वर्षभरात एकही शेतकरी हिताचा निर्णय घेतलेला नाही. कर्जमाफीला वर्ष झाल्यानंतर लक्षात आले की कुणाच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांचा वणवा पेटणार यात दुमत नसल्याचे खासदार राजू शेट्टी म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...