agriculture news in marathi, agitation for agriculture issues, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी येथे संघर्ष पदयात्रेचा समारोप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

परभणी  ः शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. ३) वडगाव स्टेशन (ता. सोनपेठ) येथून काढण्यात आलेली संघर्ष पदयात्रा शुक्रवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाली. या वेळी या यात्रेचा समारोप झाला. जिल्हा प्रशासनाने आधारभूत किमतीने खरेदी करावी या मागणीसाठी मुगाची पोती भरलेला ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभा करण्यात आला होता.

परभणी  ः शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. ३) वडगाव स्टेशन (ता. सोनपेठ) येथून काढण्यात आलेली संघर्ष पदयात्रा शुक्रवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाली. या वेळी या यात्रेचा समारोप झाला. जिल्हा प्रशासनाने आधारभूत किमतीने खरेदी करावी या मागणीसाठी मुगाची पोती भरलेला ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभा करण्यात आला होता.

शेतकऱ्यांना विमा परतावा देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, बंद साखर कारखाने सुरू करावेत, थकित ऊस देयके अदा करावीत, सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, नवीन कर्ज वितरीत करावे आदींसह स्थानिक प्रश्नी काढण्यात आलेल्या या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी या तालुक्यांतील ८३ गावांमधील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत जनजागृती करण्यात आली.

शुक्रवारी (ता. ७) ही संघर्ष पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकली. या वेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष माऊली कदम, अखिल भारतीय किसान सभेचे विलास बाबर, बंडू सोळंके, अनंत कदम आदी उपस्थित होते.

सातत्याने मागणी करूनही हमीभाव खरेदी केंद्र सुरू न करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. शासन तसेच प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा झाली. मूग घेऊन आलेल्या ट्रॅक्टर तसेच बाजार समितीमध्ये आलेल्या शेतीमालाचे वजन इलेक्ट्राॅनिक वजन काट्यावर करावे. हमीभावाने खरेदी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...