agriculture news in marathi, agitation of congress party, buldhana, maharashtra | Agrowon

कर्जमाफी, पीककर्जप्रश्नी बुलडाण्यात काँग्रेसचा आसूड मोर्चा
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

बुलडाणा  : शेतकरी कर्जमाफी व पीककर्जाच्या मुद्द्यावरून शासनाला जागे करण्यासाठी शनिवारी (ता. ३०) काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर अासूड मोर्चा काढला. अखिल भारतीय काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने मोर्चा अायोजित करण्यात अाला होता. जिल्हाध्यक्ष अामदार राहुल बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अामदार हर्षवर्धन सपकाळ, गणेशराव पाटील, श्याम उमाळकर यांच्यासह प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.

बुलडाणा  : शेतकरी कर्जमाफी व पीककर्जाच्या मुद्द्यावरून शासनाला जागे करण्यासाठी शनिवारी (ता. ३०) काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर अासूड मोर्चा काढला. अखिल भारतीय काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने मोर्चा अायोजित करण्यात अाला होता. जिल्हाध्यक्ष अामदार राहुल बोंद्रे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अामदार हर्षवर्धन सपकाळ, गणेशराव पाटील, श्याम उमाळकर यांच्यासह प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.

राज्य शासनाची कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवी योजना अाहे. शेतकऱ्यांच्या सन्मानाऐवजी अपमान करणारी ही योजना असल्याचा आरोप या वेळी करण्यात अाला. बुलडाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार मैदानावरून मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत मोर्चा निघाला. संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी श्री. वासनिक यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर घणाघाती टीका केली. दिलेले कुठलेही अाश्वासन पूर्ण झालेले नसून यांच्या कारभाराला जनता कंटाळल्याचे ते म्हणाले. 

या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते व शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या हातात ‘नुसत्याच घोषणा, घोषणांचे गाजर, कर्जमाफी द्या...कुठे आडवे गेले मांजर’, ‘थकलो अाम्ही करून करून अर्जावर अर्ज...मुख्यमंत्रीसाहेब सांगा ना कधी मिळणार पीककर्ज’ अशी उपहासात्मक टीका करणाऱ्या घोषणांचे फलक झळकत होते. मोर्चासाठी जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...