agriculture news in marathi, agitation for crop insurance,beed, maharashtra | Agrowon

पीकविम्यासाठी केज येथे धरणे आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

केज, जि. बीड  : मागील चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अार्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ सोयाबीन पिकाचा विमा वाटप करावा, यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.११) येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. 

केज, जि. बीड  : मागील चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अार्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ सोयाबीन पिकाचा विमा वाटप करावा, यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.११) येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. 

आंदोलनात नमिता मुंदडा, नेताजी शिंदे, गुंडाप्पा भुसारी, महादेव सुर्यवंशी, राहुल गदळे, अतुल इंगळे, लिंबराज फरके, प्रकाश राऊत, सुदाम पाटील, शरद इंगळे, शिवाजी पाटील, खादीर खुरेशी, मोबिन भाई, लिंबराज फरके, संतोष जाधव, अनुरथ उबाळे, मच्छिंद्र जोगदंड, पंडित शिंदे, प्रकाश राऊत, युवराज ढोबळे, बाळासाहेब शिंदे, रवींद्र नांदे, सुरेश घोळवे, सुरेश मुकादम आदींसह राष्ट्रवादीचेे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार डी. सी. मेंडके यांना देऊन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

अंबाजोगाई येथे आंदोलन
अंबाजोगाई, जि. बीड  : शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीकविमा त्वरित वाटप करावा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता.११) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अक्षय मुंदडा, बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, मीना भताने, शेख रहिम, तानाजी देशमुख, सारंग पुजारी, संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, कल्याण भिसे, व्यंकटेश चामनर, बालासाहेब पाथरकर, राजकुमार गंगणे, वैजनाथ देशमुख आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

या आहेत प्रमुख मागण्या

  • मागील खरीप हंगामातील सोयाबीनचा पीकविमा पेरणीपूर्वी वाटप करावा. 
  • सरसकट कर्जमाफी द्यावी.
  • शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे.
  • मागील शैक्षणिक वर्षाची विद्यार्थ्यांची परीक्षा व शैक्षणिक फी माफ करावी.
  • विधानसभा मतदारसंघात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करावीत. 
  • जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी; अन्यथा यासाठी अनुदान द्यावे.    
  • दुष्काळात पाण्याअभावी वाळून गेलेल्या फळबागांसाठी शेतकऱ्यांना अार्थिक मदत करावी. 

 

इतर ताज्या घडामोडी
अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृतीअमरावती ः रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यायवतमाळ : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील...
दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदीजी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी...
सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या...सांगली : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे....
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चार-...
नातेपुते-पंढरपूर मार्गावर वाहतुकीत तीन...सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि...
पीककर्ज वाटप ७० वरून  ४५.५० टक्क्यांवर...मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजना राबवूनही...
अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे...अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी...
बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर...मुंबई  ः शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत...
अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्रीअमरावती  ः जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस...
वसारी येथे ‘स्वाभिमानी’ने केली दगड पेरणीवाशीम : खरीप हंगाम दारात आलेला असतानाही...
संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस...वर्धा ः दूध संघाला केवळ ११ हजार लिटर खरेदीची...
वाशीममध्ये सरासरी १६.८२ टक्के पीक...वाशीम ः  जिल्ह्यात २०१९-२० या वर्षाच्या खरीप...
जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू...मुंबई ः राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत...
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा धार फाटा येथे...गोजेगाव, जि. हिंगोली : बॅंका पीक कर्ज...
वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव...मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न...
जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...