agriculture news in marathi, agitation for demand to start pulses purchasing centers, satara, maharashtra, | Agrowon

खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात बळिराजा संघटनेचे उपोेषण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, शेतीमाल तारण योजना सुरू करावी, एकही व्यापारी सोयाबीन हमीभावाने खरेदी करत नसून काटामारी, हमाली, घट या नावाखाली लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी (ता.२४) निवेदन देत संघटनेने उपोषण सुरू केले आहे.

सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, शेतीमाल तारण योजना सुरू करावी, एकही व्यापारी सोयाबीन हमीभावाने खरेदी करत नसून काटामारी, हमाली, घट या नावाखाली लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सोमवारी (ता.२४) निवेदन देत संघटनेने उपोषण सुरू केले आहे.

जिल्ह्यात सोयाबानीसह अन्य कडधान्यांची काढणी सुरू झाली आहे. मळणी करून शेतीमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे. बाजारात मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतीमाल खरेदी केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करता येत नाही. यासाठी बळिराजा शेतकरी संघटनेने बुधवारी (ता.१२) शेतीमाल खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने सोमवारपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळिराजा शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले आहे.

या वेळी पंजाबराव पाटील म्हणाले, की आमच्या मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधकारी श्वेता सिंघल यांची भेट घेतली आहे. खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करता येत नाही. याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या मार्गाने लूट करत आहेत. यामुळे त्वरित खरेदी केंद्र तसेच शेतमाल तारण योजना सुरू करावी व लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांत कारवाई केली जाईल, असे अाश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...