agriculture news in marathi, agitation for electricity bills, kolhapur, maharashtra | Agrowon

वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत काढणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ रद्दबाबतचे शासन परिपत्रक ३१ जानेवारीपर्यंत काढणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर येथील महामार्ग रोको आंदोलन सोमवारी (ता.२१) मागे घेण्यात आले. 

शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ रद्दबाबतचे शासन परिपत्रक ३१ जानेवारीपर्यंत काढणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर येथील महामार्ग रोको आंदोलन सोमवारी (ता.२१) मागे घेण्यात आले. 

अवाजवी वीज दरवाढ रद्द करावी, शेती पंपांच्या वीजबिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे पंचगंगा पुलावर सोमवारी पुणे - बंगळूर महामार्ग रोको आंदोलन सुरू करण्यात आले होते. शासनाकडून वीज दरवाढ रद्दबाबतचे पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला होता. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देत वीज दरवाढ रद्दबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सर्व कृषिपंप धारकांचे मीटर रीडिंग न घेता सरासरी जादा दिलेल्या बिलांच्या योग्य दुरुस्त्या कराव्यात, दुरुस्त केलेली वीज बिले भरण्यासाठी कृषी संजीवनी योजना जाहीर करावी, कृषी पंपधारकांसाठी नवीन वीज दर सवलतीने ठरवावेत, शासकीय पाणीपट्टीचे दर सवलतीचे ठरवावेत, औद्योगिक वीज दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारने ३४०० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, घरगुती वीज दरवाढ रद्द करावी, कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी रात्रीऐवजी दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा, गुऱ्हाळघरांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.  

खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, डॉ. सुजीत मिणचेकर, सत्यजीत पाटील, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, अरुण लाड, खासदार धनंजय महाडिक, भगवान काटे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, रणजित जाधव, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे आंदोलनात सहभागी झाले होते. 

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...