agriculture news in marathi, agitation of farmer, pune, maharashtra | Agrowon

कृषी आयुक्तांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. त्यावर लेखापरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत.

- दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग.

पुणे  ः नेवासा तालुक्यातील पुनतगाव (जि. नगर) येथील शेतकरी दीपक धनगे यांनी शुक्रवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नेवासा तालुक्यातील अन्न सुरक्षा अभियानातील भ्रष्टाचारप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून त्यानी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कृषी आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

यासंदर्भात श्री. धनगे म्हणाले, की ``कृषी विभागातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंबंधीची तक्रार कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी केली होती. या प्रकरणी चौकशी अधिकारी नेमून १९ महिन्यांचा कालावधी होऊनही नेवासा तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर आत्मदहन करेन, असा इशारा देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. कारवाईसंदर्भात लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आयुक्तालयातून हलणार नाही.``

नेवासा तालुका कृषी अधिकारी यांनी २०१५-१६ या वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचे केवळ कागदोपत्री वाटप केल्याचा आरोप आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्याच्या खोट्या सह्या, खोटे अंगठे, खोट्या शेतीशाळा, अस्तित्वात नसलेल्या दुकानांतील बिले जोडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे  दोषींवर निलंबनाची कारवाई करून अपहाराची रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, चौकशी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी धनगे यांची मागणी आहे.
 

इतर बातम्या
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया...अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
लातूर :थकित पैशांसाठी अडत्यांचे उपोषणलातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...