पाथर्डी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिला दूध, भाजीपाला भेट

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

नगर : पाथर्डी येथे मंगळवारी (ता. ५) शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूध व भाजीपाला भेट देत आंदोलन केले. शेतकरी देशोधडीला लागत चालला आहे. थोडीफार कणव असेल तर शेतकऱ्यांचे दुःख समजून घेत त्यांना आधार द्यावा, असा निरोप मुख्यमंत्र्यांना द्या, असे कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना सांगितले.

दूध, भाजीपाला, शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. सरकारकडे मागण्या मांडूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे पाथर्डी येथे शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद बाबासाहेब मरकड, साईनाथ घोरपडे, शिवशंकर राजळे. बन्सी पाटील आठरे, विनायक चौधरी, दीपकराव माने, सीताराम बोरुडे, अमोल ठोंबरे अदिनाथ माने, योगेश चितळे, यमाजी सावंत, कानिफ मरकड, शुभम वाबळे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना भाजीपाला व दूध भेट दिले. ही भेट देवेंद्र फडणवीस यांना पोच करत शेतकऱ्यांच्या भावना सांगा, अशी विनंतीही आंदोलनकर्त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com