agriculture news in marathi, agitation of farmers for crop insurance refund, parbhani, maharashtra | Agrowon

खरीप पीकविमा परतावाप्रश्नी परभणीत उपोषण सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

परभणी : जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेले जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा, या मागणीसाठी तसेच प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शेतकरी पीकविमा संघर्ष समितीतर्फे मंगळवारपासून (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

परभणी : जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेले जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर करावा, या मागणीसाठी तसेच प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शेतकरी पीकविमा संघर्ष समितीतर्फे मंगळवारपासून (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

अनियमित, अल्प पावसामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली होती. परंतु पीकविमा संरक्षण घेऊनही शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा परतावा मिळालेला नाही. अत्यंत तुटपुंजा विमा परतावा मंजूर करण्यात आला. राज्य शासनाच्या कृषी सांख्यिकी विभागाने पीकविम्यासाठी मंडलाऐवजी तालुका घटक धरल्यामुळे १०० कोटी रुपये, महसूल आणि कृषी विभागातील एकमेकांच्या अविश्वासामुळे क्षेत्र सुधार गुणांक लावल्यामुळे ५४ कोटी २४ लाख ४२ हजार ३३६ रुपये, पीक कापणी प्रयोगातील कृषी विभागाचा हलगर्जीपणा आणि विमा कंपनीचा बेकायदेशीर हस्तक्षेप तसेच कृषी विभागाने दिलेले उत्पादनाचे आकडे न मानता निर्धारित केलेल्या उत्पादनाच्या आकड्यांचा आधार घेऊन ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपये अशी एकूण २०५ कोटी ८ लाख ३ हजार ५६८ रुपये एवढी फसवणूक झालेली आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, विमा कंपनी यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शेतकरी पीकविमा संघर्ष समितीचे समन्वयक तथा जिल्हा परिषद सदस्य डाॅ. सुभाष कदम, श्री निवास जोगदंड, राजन क्षीरसागर आदींच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले आहे. विविध तालुक्यांतील शेतकरी यात सहभागी झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...