agriculture news in marathi, agitation of farmers for crop insurance refund, parbhani, maharashtra | Agrowon

पीकविमा परताव्यासाठी आंदोलन तीव्र करणार : खासदार जाधव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

परभणी  ः पीकविमा नुकसानभरपाई मंजूर करावी, ही शेतकऱ्यांची न्याय्य मागणी आहे. त्यामुळे परतावा मंजूर करण्यासाठी आंदोलन आणखीन तीव्र केले जाणार असून, अनेक राजकीय पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

परभणी  ः पीकविमा नुकसानभरपाई मंजूर करावी, ही शेतकऱ्यांची न्याय्य मागणी आहे. त्यामुळे परतावा मंजूर करण्यासाठी आंदोलन आणखीन तीव्र केले जाणार असून, अनेक राजकीय पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विमा परताव्याबाबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण रविवारी (ता.१) सहाव्या दिवशीही सुरूच होते. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण जोखीमसह विमा परतावा मंजूर करण्यासाठी शुक्रवारी (ता.२९) शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली.

याप्रकरणी राज्य सरकारला सोमवार (ता.२) पर्यंत निर्देश प्राप्त होतील. परंतु विमा परतावा मंजूर करण्यासाठी बुधवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या, गुरुवारी (ता.५) जिल्हाबंद, शुक्रवारी (ता.६) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.

या वेळी माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, राजन क्षीरसागर, विलास बाबर, श्रीनिवास जोगदंड उपस्थित होते. येत्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार विजय भांबेळ, डॉ.मधुसूदन केंद्रे, डॉ. राहुल पाटील हा प्रश्न लावून धरणार आहेत, असे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...