agriculture news in marathi, agitation of farmers for crop loan, aurangabad, maharashtra | Agrowon

पीककर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे औरंगाबादला आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

औरंगाबाद  : खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे, या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर बुधवारी (ता.१२) शेकडो शेतकऱ्यांनी त्वरित पीककर्ज वाटप करावे, या मागणीसाठी घेराव आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. याप्रकरणी लवकरच बॅंक संचालक मंडळाची बैठक बोलविण्याचे लेखी आश्‍वासन बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

औरंगाबाद  : खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे, या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर बुधवारी (ता.१२) शेकडो शेतकऱ्यांनी त्वरित पीककर्ज वाटप करावे, या मागणीसाठी घेराव आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. याप्रकरणी लवकरच बॅंक संचालक मंडळाची बैठक बोलविण्याचे लेखी आश्‍वासन बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

केवळ औरंगाबादेमध्येच नाही; तर संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज मिळण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज मिळावे, यासाठी संतोष पाटील जाधव (वजनापूरकर) यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा बॅंक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यावर निर्णय न झाल्याने संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयावर धडक देऊन घेराव आंदोलन सुरू केले.

या वेळी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागण्यासंदर्भात लेखी आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर चर्चेअंती श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसदर्भात लवकरच संचालक मंडळाची बैठक घेण्याचे लेखी आश्‍वासन दिले.

या बैठकीत अटी शिथिल करण्याकरिता किंवा मार्ग काढण्याकरिता प्रयत्न करण्याचे, शिवाय केलेल्या दुरुस्तीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामाचे कर्जवाटप केले जाईल, अशीही खात्री श्री. पाटील यांनी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • नवीन सभासदांना कर्जवाटप करताना संस्थेची बॅंक पातळीवरील कर्जवसुलीची अट रद्द करा.
  • चालू बाकीदार कर्जदारांना नियमित तीन वर्षांची वसुलीची अट रद्द करा.
  • अंतिम विनाअट धारण क्षेत्राप्रमाणे कर्जवाटप करावे.
  • कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनाही धारण क्षेत्राप्रमाणे कर्जवाटप करावे.
  • धारण क्षेत्राप्रमाणे हेक्‍टरी १ लाख रुपयांप्रमाणे कर्जवाटप करावे.
  • दुष्काळी स्थिती पाहता ठिबक सिंचनासाठी विशेष बाब म्हणून १ लाख रुपयांचे कर्ज द्यावे.
  • विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या गटसचिवांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्यावे.
  • विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या गटसचिवांच्या थकीत व चालू वेतनासाठी संस्थेस बिनव्याजी कर्ज द्यावे.

 

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...