संग्रामपूर येथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे जनावरांसह उपोषण

शेतकऱ्यांचे उपोषण
शेतकऱ्यांचे उपोषण

संग्रामपूर, जि. बुलडाणा  ः कर्जमाफी तसेच नवीन पीककर्जाच्या मागणीसाठी येथील बँक शाखांसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. मात्र चार दिवसांपासून याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी शुक्रवारी (ता. ७) जनावरांसह उपोषणाला बसले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी प्रशासन व बँकांकडून मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

तालुक्यातील असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित अाहेत. तसेच नवीन पीककर्जही मिळाले नसल्याने ते अडचणीत सापडले अाहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये अनेक वेळा जाऊन काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासनाने याप्रश्नी काहीच उपाययोजना न केल्याने मंगळवारपासून (ता. ४) येथील स्टेट बँक व बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. मात्र तरीही प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात कोणताच मार्ग काढण्यात आलेला नाही.

त्यामुळे शुक्रवारी या उपोषणकर्त्यांनी जनावरांसह अांदोलन पुढे सुरू केले. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जमाफी आणि कर्जवाटपासंदर्भात तालुक्यात शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्याचा निषेध करीत १३  शेतकऱ्यांनी बँकेसमोर उपोषण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com