agriculture news in marathi, agitation for farmers demand, parbhani, maharashtra | Agrowon

कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी मानवतरोड येथे रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य किसान सभेतर्फे सोमवारी (ता.१९) मानवतरोड येथे कल्याण-परभणी-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य किसान सभेतर्फे सोमवारी (ता.१९) मानवतरोड येथे कल्याण-परभणी-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात राज्य किसान सभेचे सहसचिव कॅाम्रेड विलास बाबर, लिंबाजी कचरे पाटील, अशोक बुरखुंडे, रामराजे महाडिक, विष्णू जाधव, मुकुंद मगर, संजय देशमुख, देविदास शिंदे, वसंतराव शिंदे, उद्धव काळे, रामप्रसाद कचरे, दिनेश थिटे, भगवान ढगे, शेख इब्राहिम आदी सहभागी झाले. या वेळी तालुका प्रशासनास निवेदन देण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.
  • शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत द्यावी.
  • प्रत्येक शेतकऱ्याच्या जनावरांसाठी दावणीवर चारा देण्यात यावा.
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे.
  • इरळद, सावंगी, सोन्ना, गोगलगाव, मंगरुळ, नरळद, कोथाळा, टाकळी, पार्डी, शेवडी (ज.), राजुरा गावांसाठी निम्न दूधना धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे.
  • २०१६-१७ मध्ये दुधना नदीला आलेल्या पुरात खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई देण्यात यावी. पीकविमा परताव्याचे वाटप करण्यात यावे.
  • अन्नसुरक्षा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजाणी करत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील सदस्यांना प्रतिमाणशी ५ किलो गहू, तांदूळ धान्य अनुक्रमे २ आणि ३ रुपये किलो दराने द्यावे.
  • हरभरा, तुरीसाठी नोंदणी करून मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचे अनुदान द्यावे.  गाव तेथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत.
  • श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गरजू लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात यावेत.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...