जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना पिण्याचे पाणी नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे अशा परिस्थितीत सरकार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी (ता.२२) ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तहसील कार्यालयावर जनावरांसह शेतकऱ्यांचा संताप मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाने प्रशासनाची एकच धावपळ झाली. या वेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आता शांततेच्या मार्गाने मोर्चा आणला, येत्या पाच दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावे, जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, या मागण्यासांठी प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर जनावरांसह शेतकऱ्यांचा संताप मोर्चा काढण्यात आला.
दुपारी बसस्थानकावरून या मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जनावरासंह सहभाग घेतला. गावातील मुख्य रस्यावरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. निवेदन देतेवेळी ‘स्वाभिमानी’चे विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील, तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नंदकिशोर बोडखे, सुनील अस्वार, विलास तराळे, योगेश वखारे उपस्थित होते.
- 1 of 348
- ››