agriculture news in marathi, agitation for farmers issue, akola, maharashtra | Agrowon

शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ, मराठवाड्यात आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शनिवारी (ता. २०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विदर्भ, मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे या भागांमधील अनेक मार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती.

पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शनिवारी (ता. २०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विदर्भ, मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे या भागांमधील अनेक मार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती.

बुलडाणा, वाशीममध्ये जोरदार प्रतिसाद
अकोला ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत जोरदार प्रतिसाद मिळाला. अकोला जिल्ह्यात मात्र आंदोलनाचा तितकासा प्रभाव दिसत नव्हता. या भागात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अांदोलन झाले. तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यात वरवट बकाल येथे ठिय्या आंदोलन केले.

सिल्लोड, वैजापूर तालुक्यांत आंदोलन
सिल्लोड जि. औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भात दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी यासह  विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सिल्लोड तालुक्‍यातील पालोद येथे शनिवारी (ता. २०) चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, तालुकाध्यक्ष सुनील सनान्से यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वैजापूर तालुक्‍यातही ‘स्वाभिमानी’च्यावतीने वैजापूर-गंगापूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तीन जिल्ह्यांत आंदोलन
नांदेड ः दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी. वीजपुरवठा नियमित करावा. ऊस उताऱ्यात बदल करावा. पीक विमा लागू करावा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे आदी मागण्याही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे या वेळी करण्यात आल्या.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नांदेड, हदगांव, भोकर, मुदखेड, देगलूर आदी तालुक्यांत रास्ता रोको करण्यात आला. भोकरफाटा (ता. अर्धापूर) येथे आंदोलन करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशनराव कदम देळुबकर, तालुकाध्यक्ष माधवराव कदम, शंकरराव राजेगोरे आदींना अर्धापूर पोलिसांनी अटक केली.

परभणी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात डोंगरकडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड-कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...