‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात’ : स्वाभिमानीचे आंदोलन

नागपूर येथे आंदोलन
नागपूर येथे आंदोलन

नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट कोरा करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर येथे शनिवारी (ता. १९) ‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्जबाजारी शेतकरी मुला-मुलीचे प्रतीकात्मक लग्न लावण्यात आले. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, गेल्यावर्षी नाफेडला विक्री केलेल्या तूर, हरभऱ्याचे पैसे द्यावेत, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दीडपट हमीभावाचा कायदा करावा, दुष्काळी परिस्थितीत बॅंका व मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवावी, वीजबिल वसुली थांबवावी यांसह विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या आहेत.

संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यशवंत स्टेडियमपासून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे मोर्चेकऱ्यांनी कूच केली. परंतु विधानभवन चौकात पोलिसांनी मोर्चा अडविला. यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले. पोलिस व आंदोलक यांच्यात या वेळी शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुला-मुलीचे प्रतीकात्मक लग्न लावून देण्यात आले. या दोघांच्याही हातात कर्जाचा बोजा असलेला सात-बारा उतारा होता. नेते आणि आंदोलक नाचत- गात या आंदोलनात सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com