शेतीमाल, दूधदरासाठी खडकी फाटा येथे आंदोलन

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

नगर   ः शेतीमाल तसेच दुधाला भाव नसल्यामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यास सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. दुधाला शासनाने ठरवलेला किमान २७ रुपये भाव तसेच शेतीमालाला हमीभाव न मिळाल्यास यापुढे पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

दूध व शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी नगर तालुक्‍यातील खडकी येथे रविवारी (ता. १०) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे महेश कडूस, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, ॲड. कारभारी गवळी, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, राहुल बहिरट, अरुण कोठूळे, राघु चोभे, राजेंद्र चोभे, कैलास पठारे, सरपंच जनार्धन माने यांच्यासह खडकी, बाबुर्डी बेंद यांसह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ अधिकारी विकास झाडे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com