दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलन

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

नागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले जावे, या मागणीसाठी शेतकरी नेते संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.१६) तारसा फाट्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून मुंडण करण्यात आले. त्यासोबतच रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला.

दूध खरेदी दर घसरल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार तारसा फाटा येथे संजय सत्येकार, आंताराम श्रावणकर, गजानन डांगरे, संजय सोनसरे, शेषराव देशमुख, सुनीता सतीकुसरे, कविता ढोबळे, सुनील फुले, संजय सोमनाथे, सुरेंद्र चकोले, ईश्‍वर डांगरे, राजू वैद्य, किसनलाल बोरकर, संतोष देशमुख, विनोद कोपरकर यांच्यासह अनेकांनी दूधदर आंदोलनात सहभाग नोंदविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com