agriculture news in marathi, agitation of farmers for milk rate,pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनाचे दुसऱ्या दिवशीही पडसाद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे  ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असेलल्या दूध दरप्रश्नी आंदाेलनाचे मंगळवारी (ता. १७) दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पडसाद उमटले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध आेतून, मोफत दूध वाटप करून तर आंघाेळी करून सरकारचा निषेध केला.  

डोर्लेवाडी (ता. बारामती) आणि परिसरातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध केला. काही शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी (ता. १६) आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर एकाही शेतकऱ्यांनी येथील दूध संकलन केंद्रावर दूध घातले नाही.

पुणे  ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असेलल्या दूध दरप्रश्नी आंदाेलनाचे मंगळवारी (ता. १७) दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पडसाद उमटले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध आेतून, मोफत दूध वाटप करून तर आंघाेळी करून सरकारचा निषेध केला.  

डोर्लेवाडी (ता. बारामती) आणि परिसरातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध केला. काही शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी (ता. १६) आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर एकाही शेतकऱ्यांनी येथील दूध संकलन केंद्रावर दूध घातले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील वंचित असणाऱ्या वैदुवस्ती येथे जाऊन शेकडो लिटर दुधाचे मोफत वाटप केले. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले सरपंच बाळासाहेब सलवदे अविनाश काळकुटे, दत्ता नवले, गुलाबराब कालगावकर, संपत कालगावकर, गोट्या भोपळे, राजेंद्र लोणकर आदी उपस्थित होते.
शिरूरच्या पूर्व भागात दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू हाेते.

न्हावरे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकमेकांना दुधाने आंघाेळी घातल्या. त्याचबरोबर पूर्व भागातील दूध उत्पादकांनी रास्ता राेकाे, माेफत दूध वाटप करून आंदोलन केले. इनामगाव येथील शेतकऱ्यांनी वांगदरी(श्रीगोंद्याकडे) जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याबद्दल यांच्या निषेधाचा ठराव घेऊन त्यांना शिरूर तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा दिला. या वेळी श्रीगोंदा साखऱ कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाटगे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब गांधले, संजय घाडगे, राजाराम मचाले, महेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

वडगाव रासाई येथे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता अशोक पवार यांनी त्यांच्या गोठ्यातील सुमारे ३०० लिटर दूध गावातील सर्वसामान्य नागरिकांना वाटले. उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाने अंघोळ करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी दूध डेअरीला न घालता पेढे व खवा करणे पसंत केले. काही शेतकऱ्यांनी दूध डेअरीला घातले.

सरकारने दुधाला दरवाढ देणे आवश्यक आहे. परंतु, ती दिली जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. मात्र, केवळ संघटना काम करत आहे म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. दुधाला दरवाढ मिळाल्यास सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आजही काहीजण प्रकल्पांना दूध घालत आहेत.

संघटना आंदोलन करणार आहे हे जाहीर केल्यावर लगेच सरकारला पावले उचलावी लागली व ३ रुपयांची दरवाढ जाहीर करण्यात आली. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असून दूध घालणे बंद करावे. अशा पद्धतीने नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडणार नाही, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले.

इतर ताज्या घडामोडी
सांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे...
भातावरील लष्करी अळीचे नियंत्रणभात हे राज्यातील कोकण आणि पूर्व विदर्भातील मुख्य...
फळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...
पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी, धरणांतून...पुणे : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या...
मराठवाड्यात ८५ मंडळांत पावसाचे धूमशानऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८५ मंडळांत पावसाने...
नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची...नगर ः नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवार...
वरखेडे-लोंढे बॅरेजला `नाबार्ड`चा...चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव व भडगाव तालुक्‍...
नाशिक जिल्ह्यातील ४० वाळू घाट होणार बंदनाशिक  : वाळू घाटावरील प्रदूषण रोखण्यासाठी...
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...