agriculture news in marathi, agitation of farmers for several demands, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात तीन ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

नगर : सरकारला शेतकरी दुश्‍मन वाटत आहेत. त्यानुसारच सरकार शेतकऱ्यांना वागणूक देऊन हेळसांड करत आहे, असा आरोप करीत शुक्रवारी (ता. १) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकड जनावरे आणून आंदोलन केले. सरकारने दुधाला २७ रुपये दर द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. गतवर्षी शेतकरी संपाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणतांबे (ता. राहाता) येथे शेतकरी आणि ग्रामस्थांनी सरकारचे वर्षश्राद्ध घातले व उपस्थितांना गाजरे वाटली. अकोल्यात किसान सभेतर्फे मोर्चा काढण्यात आला. 

नगर : सरकारला शेतकरी दुश्‍मन वाटत आहेत. त्यानुसारच सरकार शेतकऱ्यांना वागणूक देऊन हेळसांड करत आहे, असा आरोप करीत शुक्रवारी (ता. १) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकड जनावरे आणून आंदोलन केले. सरकारने दुधाला २७ रुपये दर द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. गतवर्षी शेतकरी संपाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणतांबे (ता. राहाता) येथे शेतकरी आणि ग्रामस्थांनी सरकारचे वर्षश्राद्ध घातले व उपस्थितांना गाजरे वाटली. अकोल्यात किसान सभेतर्फे मोर्चा काढण्यात आला. 

शेतीमाल, दुधाला दर मिळण्यासह अन्य मागण्यासाठी  शुक्रवार पासून (ता. १) राज्यात शेतकरी संपाला सुरवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या शेतकरी संपाचे मुख्य केंद्र पुणतांबा (ता. राहाता) हे होते. शुक्रवारी संपाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र तरीही सरकारने शेतक-यांचे प्रश्न सोडवले नाहीत. याचा निषेध म्हणून शुक्रवारी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन सरकारचे वर्षश्राद्ध घातले. त्या ठिकाणी काळ्या गुढ्या उभारल्या.

गेल्या वर्षी राज्यभरातील शेतकरी संपात सहभागी झाले, मात्र सरकारने खोटी अश्वासने देऊन संप मोडीत काढल्याने सरकारच्या भूमिकेचा या वेळी निषेध करण्यात आला. पाण्याला जास्ती आणि दुधाला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी, दूध उत्पादक हतबल झाले आहेत. तरीही या सरकार दुर्लक्ष करत असल्याने गतवर्षीच्या संपाचे स्मरण म्हणून सरकारचे वर्षश्राद्ध घालत असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी स्पष्ट केले. 

दुधाला आणि शेतीमालाला दर मिळत नसल्याने शुक्रवारी भूमिपुत्र शेतकरी संघटना, पीपल्स हेल्पलाईन व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाकड जनावरे आणून दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सरकारला शेतकरी दुश्‍मन वाटत आहेत. त्यानुसारच सरकार शेतकऱ्यांना वागणूक देऊन हेळसांड करत आहे, असा आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला व सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर याप्रश्‍नी काहीच करत नसल्याने त्यांची गोटा, भेसळयुक्त दुधाने तुला केली. ॲड. कारभारी गवळी, अनिल देठे, संतोष वाडेकर, संतोष कोरडे, मोहन आंधळे, प्रवीण भोर, गणेश सुपेकर, नीलेश औटी, सुनील खोडदे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...